Pune News | आधार सेवा केंद्राकडून शनिवारी आणि रविवारी सहकारनगरमध्ये सांस्कृतिक दिवाळी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | पुण्याच्या सहकारनगर भागातील तुळशीबागवाले कॉलनी (tulshibagwale colony sahakar nagar) मैदानात शनिवार आणि रविवारी सांस्कृतिक दिवाळी (Diwali 2021) कार्यक्रम आधार सेवा केंद्रातर्फे आयोजित करण्यात आला (Pune News) आहे.

 

दिनांक ६ नोव्हेंबर (शनिवार) रोजी सायंकाळी ७ वाजता मधुमेह तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित Diabetes specialist Dr. Jagannath Dixit (दीक्षित डायट – dixit diet) यांचे आरोग्यदायी व्याख्यान
आयोजित करण्यात आले असून वेटलॉस आणि मधुमेह नियंत्रण या दोन विषयावरती ते व्याख्यान देतील या वेळेस प्रश्नोत्तराचा तास होणे अपेक्षित आहे
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

 

तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक ७ नोव्हेंबर २०२१रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक (jitendra bhuruk singer) यांचा किशोर कुमार (Kishor Kumar),
मोहम्मद रफी (mohammed rafi) तसेच अन्य नामांकित गायकांचा “गीतो का सफर” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला पुण्याचे
(Pune News) महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
मार्गदर्शक म्हणून काँग्रेस पक्ष नेते आबा बागूल उपस्थित राहतील.

 

हे दोन्ही कार्यक्रम नागरीकांसाठी विनामूल्य आहेत. यावेळी कोरोनाचा प्रसार थांबल्यामुळे वातावरण पूर्ववत होत असताना कोरोना संपला नाही
याची जाण घेऊन नागरिकांच्या काळजीबद्दल ही विशिष्ट निर्देश दिले जातील.
या कार्यक्रमाचे आयोजन आधार सेवा केंद्राचे (Adhar Seva Kendra) अध्यक्ष हेमंत आबा बागूल (Hemant Aba Bagul) यांनी केले आहे.

 

Web Title : Pune News | Cultural Diwali in Sahakarnagar on Saturday and Sunday from Aadhar Seva Kendra!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Supriya Sule | ‘इंदापुरात मी पाटलांना घाबरतो’ राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंची टोलेबाजी, म्हणाल्या…

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 94 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Earn Money | जर तुमचे सुद्धा असेल एखाद्या बँकेत अकाऊंट, तर मोफत मिळेल 2 आणि 4 लाखाचा फायदा; जाणून घ्या सविस्तर?