Pune news : पिस्तुल बाळगणार्‍याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह 2 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बेकायदेशीर पिस्तुल घेऊन आलेल्या एकाला गुंडाला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शुभम रवींद्र पाटोळे (वय 22, रा. पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात सराईत गुन्हेगार तसेच उद्योग करणाऱ्या तरुणांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्यावर पाळत ठेवून माहिती काढली जात आहे. तर वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी हद्दीत गस्त घातली जात आहे. यादरम्यान दत्तवाडी पोलिसांचे डीबी पथक हद्दीत गस्त घालत असताना कर्मचारी अक्षयकुमार वाबळे व कुंदन शिंदे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की जनता वसाहत परिसरात एकजण संशयित उभा आहे. ही माहिती समजताच त्यांनी खात्री केले. त्यानुसार सापळा रचला. तसेच त्याला पथकाने सापळा राचुन अटक केली.
तसेच त्याच्याकडूज पिस्तुल व काडतुसे जप्त करत त्याला अटक केली आहे. फिर्यादी यांना वेळाने हा प्रकार लक्षात आलं. पोलिसांनी शोष घेत चौघांना अटक केली आहे. त्याने हे पिस्तुल कोठून आणले आणि तो कशासाठी बाळगत होता, याचा तपास सुरू आहे. तर त्याच्यावर यापूर्वी समर्थकांसोबत भांडण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पथकतील कुंदन शिंदे, महेश गाढवे, नावनाथ भोसले यांच्या पथकाने केली आहे.