Pune News : बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणार्‍याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला दत्तवाडी पोलिसांच्या (Dattawadi Police) डीबी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले आहे.

गोपाळ उर्फ रोहितभाऊ बंडू गवळे (वय 22, रा. इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात वाढत्या गुन्हेगारी व घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना अटकाव करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस हद्दीत गस्त घालून माहिती काढत आहेत. यादरम्यान दत्तवाडी पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार कुंदन शिंदे यांना त्यांच्या बातमीदाराने त्यांना सराईत गुंड पिस्तुल घेऊन बाल शिवाजी चौकात थांबला आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, महेश गाढवे, अक्षयकुमार वाबळे, सागर सुतकर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, प्रमोद भोसले, विष्णू सुतार यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळाले

गोपाळ उर्फ रोहितभाऊ हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने पिस्तुल कोठून आणले आणि तो त्याचा वापर कुठे करणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत.