Pune News | शौचालयासाठी खोदलेल्या शोष खड्ड्यात पडून 3 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शौचालयासाठी (Toilet) खोदलेल्या शोष खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Unfortunate Death) झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune News) खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द (Koregaon Khurd) येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मागील चार दिवसांपूर्वी आंबेठाण येथे अशीच घटना घडली होती. यामध्ये तीन भावंडांचा मृत्यू झाला होता. गाथा नितीन कडूसकर Gatha Nitin Kaduskar (वय-3 रा. कोरेगाव खुर्द) असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

 

कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या नितीन कडूसकर कुटुंबातील गाथा ही एकुलती एक मुलगी होती. या कुटुंबाने राहत्या घराच्या बाजूला शौचालयासाठी काही दिवसांपूर्वी शोष खड्डा (Atrophy Pit) खोदला होता. मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असल्याने खड्ड्यात पाणी साचले होते. त्यामुळे शौचालयाचे काम बंद ठेवले होते. (Pune News)

 

घरात कागदासोबत गाथा ही चिमुकली खेळत होती. खेळता खेळता ती शोष खड्ड्याजवळ गेली. आणि पाण्यात पडली.
बराच वेळ गाथा दिसली नसल्याने घराच्या आसपास तिचा शोध घेतला.
त्यावेळी शोष खड्ड्यात साठलेल्या पाण्यात ती खेळत असलेला कागद पाण्यावर तरंगताना दिसून आला.
गाथा पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करुन पाण्यात शोध घेतला असता ती पाण्यात आढळून आली.

 

Web Title :- Pune News | death of little gatha after falling into toilet drain in chakan area of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘राज्यपाल, हे काय सुरु आहे?’, संजय राऊतांनी दाखवली राज्यघटना

 

Eknath Shinde | ‘माझी बायपास सर्जरी झाल्यानंतर एकाही ठाकरेंचा फोन नाही; मात्र एकनाथ शिंदे 3 वेळा भेटून गेले’

 

Pune Crime | हॉटेल बॉटल फॉरेस्ट, हॉटेल ब्ल्यु शॅक मधील अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा, 10 जणांवर FIR