Pune News | नवीन मराठी शाळेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ बुधवारी (4 जानेवारी) सकाळी 11.00 वाजता शाळेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune News)

 

त्या म्हणाल्या की, कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर आणि ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रभाकर भावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून उद्योजिका स्मिता घैसास कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

 

मुख्याध्यापिका कल्पना वाघ, शिक्षक धनंजय तळपे, तनुजा तिकोने, भाग्यश्री हजारे, प्रिया इंदूलकर, अर्चना देव, वंदना कदम यांची पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती होती. (Pune News)

वाघ म्हणाल्या की, नवीन मराठी शाळेची स्थापना 4 जानेवारी 1899 मध्ये झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे शाळेचे पहिले शालाप्रमुख होते. या वर्षी 4 जानेवारीला शाळा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घटन समारंभात शाळेची वेबसाईट, शाळेचा लोगो याचे अनवारण करण्यात येणार आहे. याशिवाय शाळेबद्दल तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिखित स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या हस्तलेखाचे देखील उद्घटन होणार आहे. कार्यक्रमात माजी शिक्षक, माजी कर्मचारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच शाळेतर्फे विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. असे ही वाघ यांनी सांगितले.

 

वाघ म्हणाल्या, ‘सर्व 22 वर्गांमध्ये स्मार्ट टीव्हीसह ई-लर्निंगची सुविधा, कायम स्वरूपी विज्ञान प्रदर्शन, संगीत,
चित्रकला, मातीकाम यासाठी सुसज्ज वर्ग, 50 संगणकासह सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालयाचे अाधुनिकीकरण,
शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण, सौरऊर्जा प्रकल्प, ठिबक सिंचन योजना, बगिचाचे सुशोभिकरण,
पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे, पाण्याच्या टाक्यांची क्षमता वाढविणे आदी योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
त्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करीत आहे.
अधिक माहितीसाठी 020-67656820 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.’

 

Web Title :- Pune News | Debut of new Marathi school in centenary silver jubilee year

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल