Pune News | मतदार कमी असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निवडणूका घेण्याचा निर्णय – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | कोरोनाचे संकट अजून टळले नाही. ३१ ऑगस्टपर्यंत गृहनिर्माण सोसायट्यांसह सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. ती मुदत आता संपत येत असल्याने ज्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदार संख्या कमी आहे, त्याठिकाणी कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करून निवडणुका घेण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, हजारोंच्या संख्येने मतदार असलेल्या सोसायट्या आणि इतर संस्थांबाबत गांभीर्याने विचार करून पावले टाकली जातील, असेही त्यांनी यावेळी (Pune News) स्पष्ट केले.

पवार म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षी राज्य सरकारने निवडणूका ३१ डिसेंबर २०२०पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या निवडणूका पुढे ढकलल्या. सततच्या मुदतवाढीमुळे बहुतांश सोसायट्यांमधील पदाधिकारी त्रासले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सोसायट्यांच्या सभासदांकडून करण्यात येत होती.

राज्यातील गृहनिर्माण संस्था :  सुमारे एक लाख

अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था :  ८५ हजार

पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्था :  १८ हजार

अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या संस्था :  १५ हजार

 

Web Title : Pune News | decision to hold elections for housing societies Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ration Card | कामाची गोष्ट ! रेशन कार्ड बनवणे झाले अवघड, नवीन सॉफ्टवेयरमध्ये आता ‘हे’ कागदपत्र देणे आवश्यक; जाणून घ्या

Jan Ashirwad Yatra | उन्होंने हवा कर दी सर ! जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंना बड्या नेत्याचा ‘कॉल’, बातचीत व्हायरल

Pune News | इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने 19 वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन