Pune News | धनकवडीमधील शेवटचा बसस्टॉप येथे ‘विठू माऊली भक्ती शिल्पा’चे लोकार्पण

देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, ह.भ.प. माऊली महाराज जंगले, आ. भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर, युवा नेते गणेश भिंताडेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune News) प्रभाग क्र. 39 धनकवडी-आंबेगाव पठार (Dhankawadi-Ambegaon pathar) मधील धनकवडी शेवटचा बसस्टॉप येथे नगरसेविका वर्षा तापकीर (Corporator Varsha Tapkir) यांच्या संकल्पनेतून आणि स्व. उत्तमरावजी भिंताडे फाऊंडेशनचे गणेश भिंताडे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ‘विठू माऊली भक्ती शिल्पा’चा लोकार्पण सोहळा पार पडला. पुण्यातील (Pune News) धनकवडी मध्ये उभारण्यात आलेल्या शिल्पाचे लोकार्पण श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज व देहू संस्थानचे (Dehu Sansthan) अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे (Nitin Maharaj More), ह.भ.प. माऊली महाराज जंगले (Mauli Maharaj Jungle) व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव (आण्णा) तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी भर पावसात देखील धनकवडी – आंबेगाव पठार परिसरातील संप्रदाय समुदयातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी टाळ मृदुंगासह भजन करत संपुर्ण धनकवडी गावचे वातावरण भक्तीमय करून या लोकार्पण सोहळ्याची शोभा वाढवली. (Pune News) याप्रसंगी बोलताना ह.भ.प. नितीन महाराज मोरे म्हणाले, अखंड वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेले हे प्रेरणादायी व प्रत्येकाला नवीन उर्जा देणारे शिल्प उभारल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तर ह.भ.प. माऊली महाराज जंगले यांनी धनकवडी गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री जानुबाई माता चरणी आणखी एक मानाचा तुरा अर्पण करत धनकवडी बसस्टॉपला (Dhankawadi bus stop) भक्ती शिल्प म्हणून नवीन ओळख करून दिली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने नगरसेविका वर्षा तापकीर व युवा नेते गणेश भिंताडे यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

 

 

यावेळी ह.भ.प. संतोष महाराज मोरे, ह.भ.प. मालुसरे सर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिगंबर डवरी (BJP senior leader Digambar Davari),
नगरसेविका मोहिनी देवकर (Corporator Mohini Deokar), खडकवासला विधानसभा मतदार संघाचे (Khadakwasla Assembly constituency)
युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बदक (Sachin Badak), अभिषेक तापकीर, आप्पासाहेब धावणे, संदीप बेलेदरे, रणधीर गायकवाड, माऊली पांचाळ, सत्यवान कामथे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) रामकृष्ण चिंचकर, किरण जोशी, उमेश खंडेलवाल, मनोज नाईक, नितीन पायगुडे, गणेश दिघे, विशाल पोमण, अरविंद पोमण,
विक्रांत तापकीर, श्रेयस फुगे, नवनाथ शिंदे, काळुराम चव्हाण, अशोक देशमाने, केतन यादव, स्वप्निल क्षीरसागर, कानिफनाथ शिंदे, तुषार गायकवाड, सचिन यादव,
आकाश लोंढे, मयुर दातीर, शुभम सुरगुडे, करण शहा, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व धनकवडी भागातील संप्रदाय समुदयातील नागरिक,
सर्व संघटना व गणेश मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title :- Pune News | Dedication of ‘Vithu Mauli Bhakti Shilpa’ at the last bus stop in Dhankawadi of pune, mla bhimrao tapkir, corporator varsha tapkir, ganesh bhintade present

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीचा खून करुन मृतदेह पुरला; पुण्याच्या दौंड येथील घटना

Pune Crime | पुण्यातील RSS कार्यालयाबाहेर संशयित बॅग आढळल्यानं खळबळ पण… (व्हिडिओ)

Earn Money | दरमहिना पाहिजे असेल मोठी कमाई तर मोफत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या कशी करावी सुरूवात