Pune News | देहूमध्ये मांस, मच्छीवर बंदी ! नियमांचं पालन न केल्यास कारवाई !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील देहू नगरीमध्ये (Dehu) आजपासून (1 एप्रिल) पुन्हा एकदा मांस आणि मच्छी विक्रीवर बंदी घातली (Pune News) आहे. याबाबत ठराव देहू नगरपंचायतीच्या (Dehu Nagar Panchayat) सर्वसाधरण सभेमध्ये संमत करण्यात आला आहे. मध्यंतरी काळात मांस आणि मच्छी विक्री जोरात सुरू होती. आता या विक्रीला चाप लागणार आहे. (Dehu Nagar Panchayat Ban Sale Of Fish Meat)

 

देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव (CEO Prashant Jadhav) यांनी सांगितले की, ”यापूर्वी देहूत ग्रामपंचायत असताना मांस आणि मच्छीवर बंदी होती. अलीकडेच निवडणुकांचं बिगुल वाजल्यानं त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले होते. त्या काळातच मांस आणि मच्छी विक्री जोरात सुरू होती. मात्र आता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत होताच पूर्वीचा मांस आणि मच्छी बंदीचा निर्णय एक मताने घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.” (Pune News)

 

पुढे मुख्याधिकारी जाधव म्हणाले, ”तुकोबांच्या देहू नगरीत मांस, मच्छी वर बंदी होती. पण नगरपंचायतच्या निवडणूका येताच देहूत प्रशासक नेमण्यात आले होते, त्याचबरोबर कोरोनाच्या काळात मांस, मच्छीची विक्री देहूत पाहण्यास मिळत होती. नगरपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली असून फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत देहू नगरपंचायत हद्दीत मांस, मच्छीवर बंदी घालावी असा एक मताने ठराव केला आहे. या नियमांच पालन न केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणाले.”

 

Web Title :-  Pune News dehu nagar panchayat ban sale of fish meat CEO Prashant Jadhav

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा