Pune News | विकास हवाच आहे, मात्र आपल्या परंपरा मोडून नको, काँग्रेस नेत्याने पालिकेला दिला पर्याय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहराचे (Pune News) सांस्कृतिक वैभव असणारी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक (pune ganpati visarjan miravnuk) दीर्घकाळ लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड, लाल बहादुर शास्त्री रोड अश्या विविध ठिकाणाहून या मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणूका वाजत गाजत सजावटीसह लकडी पुलावरून जातात. मात्र यंदा मिरावणुकांच्या उंचीचा प्रश्न मेट्रो पुलामुळे (Metro bridge) निर्माण झाला होता. पुणे शहरात (Pune News) कोणत्याही परिस्थितीत मेट्रो हवीच आहे, मात्र आपल्या पुण्याचे पुणेरीपण जपणारी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मोडीत काढू नये यासाठी नवा पर्याय पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल (Congress leader Aba Bagul) यांनी आर्किटेक्ट आयआयटीयन्स अतुल राजवडे व सहकाऱ्यांच्या मदतीने तयार केला आहे.

यामध्ये लकडी पुलावरून (lakdi bridge pune) मेट्रो जात असल्यामुळे याठिकाणी मेट्रो पुलाची उंची साधारण 20 फूट इतकी असल्याने हा पूल सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण ठरत आहे.
काउंटर वेट मेकॅनिझम ऑफ वॉटर टॅंक (counter weight mechanism of water tank)
या तंत्रज्ञानामुळे सहज 40 फुटापर्यंत उंची वाढवणे शक्य होईल व विसर्जन मिरवणूक झाल्यावर पूर्ववत करता येईल.
साधारण या पुलाचे वजन 100 टन असून 25 टनाचे 4 काउंटर वेट वॉटर टँकच्या मदतीने उचलण्यात येणार असून याकरिता स्टेनलेस स्टील गियर मकॅनिझमचा वापर करण्यात येणार आहे.

यासाठी साधारण 8 ते 10 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे तंत्रज्ञान संपूर्ण मेंटेनन्स फ्री असणार आहे.
या तंत्रज्ञानासाठी उभारण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरवर व्युव्हिंग गॅलरी (Viewing Gallery) व सोलर पॅनल (Solar panel) तयार करून येणाऱ्या उत्पनांतून काही वर्षात मेट्रो पुलाचा खर्च निघेल व कायम उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होईल.
हे तंत्रज्ञान भारतातील पहिले असणार असून पुण्याच्या वैभवात भर पडणार आहे.
पूल उचल्याणसाठी 4 काउंटर वेट टाक्यांमध्ये पाणी भरल्यास पुलाची उंची 20 फूट वाढेल
व पाणी सोडून दिल्यास पूर्ववत होईल.
त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका या पुलाखालून ट्रॅक्टर, ट्रॉली,
देखावे 40 फुटापर्यंत जरी गेले तरी सहज निघून जाईल.

 

आर्किटेक्ट अतुल राजवडे (Architect Atul Rajwade) व त्यांच्या टीमने हे तंत्रज्ञान
विकसित केले आहे. पुणे शहराच्या परंपरेला बाधा न येता मेट्रो प्रकल्प (Metro project) सुरू राहील.
व सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पूर्ण होण्यास कोणतीही बाधा येणार नाही.
यामुळे शहरातील विकासही होईल व पुण्याची परंपराही कायम राहील असे आबा बागूल म्हणाले.

 

Web Title : Pune News | Development is needed, but don’t break your tradition, the Congress leader gave the option to the municipality

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Amenity Space | भाजप पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी पाटलांचे ऍमेनिटी स्पेस विक्रीला समर्थन – राष्ट्रवादी

Pune Crime | महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी पुणे पोलिसांकडून गजाआड (CCTV Video)

कमाईची गोष्ट ! SBI चा धमाका, आता तुम्हीसुद्धा घरबसल्या कमवा 60 हजार रुपये महिना, जाणून घ्या अटी