Pune News | पुणे जिल्ह्यात पिकतोय पहिल्यांदाच ‘निळाकाळा भात’; हार्ट अटॅकपासून बचावासाठी उपयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील आंबेगाव तालुक्यात (Ambegaon taluka) पहिल्यांदाच आसाम आणि इंडोनेशियामधून घेतल्या जाणाऱ्या निळ्या भाताची (Blue rice) लागवड करण्यात येत आहे. ही लागवड तालुक्यातील (Pune News) आदिवासी भागात केली जात आहे. तेथे आता निळसर काळ्या रंगाच्या भातपिकाच्या (Paddy crop) लोंब्या लगडल्या जात आहे. यामुळे शेतक-याचा दुर्मिळ प्रयोगाचा विषय दिसून येत आहे. विशेष म्हणजे असा शेती लागवडीचा प्रकार पुणे जिल्ह्यातील पहिलाच प्रकार आहे. यामुळे लागवडीची सर्वत्र चर्चा होताना दिसते.

 

या भाताची लागवड कृषी विभागाच्या (Department of Agriculture) पुढाकाराने करण्यात आली आहे. निळ्या भातात अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि अँथोसायनिन (Anti-oxidant and anthocyanin) असतात. सध्या निळ्या तांदळाविषयी कमीत कमीत नागरीकांना याची माहिती आहे. मुख्यता म्हणजे निळा तांदूळ पांढऱ्या तांदळापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. तसेच, निळा तांदूळ अनेक रोगांवर देखील फायदेशीर आहे, तर त्यात अँन्थोसायनिन असल्याने हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. तसेच व्यक्तीला हृदयविकाराच्या झटक्यापासून (Heart attack) देखील वाचवते.

 

भारतात निळ्या भात कमी प्रमाणात पिकवला जातो. देशातील मार्केटमध्ये निळ्या तांदळाचे दर 250 रुपये प्रतिकिलोपासून पुढे आहे. दरम्यान या भाताची लागवड आता पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होते आहे. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात शेतकऱ्यांनी जवळजवळ वीस गुंठे जागेत या निळ्या भाताची लागवड केलीय. तसेच, या भातपिकाच्या काळ्या ओंब्या आल्या आहेत. त्याठिकाणी संपूर्ण शेत काळ्या ओंब्यांनी बहरून गेले आहे. यामुळे शेतकरी आनंदीत आहेत. गंगाराम लिंबाजी हिले (Farmer Gangaram Limbaji Hile) हे पुणे जिल्ह्यातून भात शेतीत प्रथम क्रमांक मिळविलेले प्रगतशील शेतकरी आहे.

 

कॅन्सरसह विविध आजारांसाठी अधिक उपयुक्त…

निळा तांदूळ वजन कमी करण्यात खूप उपयुक्त आहे.
कारण पांढऱ्या तांदळापेक्षा यात चरबी कमी आहे.
निळ्या भातात असणारे अँटी-ऑक्सिडंट यकृत निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.
हे यकृतातील हानिकारक पदार्थांचे डिटॉक्स करते.
निळ्या भातात सापडलेला अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित करतो.
100 ग्रॅम निळ्या भातात साधारणपणे 4:5 ग्रॅम फायबर असते जे आपले पचन करण्यास उपयुक्त होते. तसेच डोळ्यांसाठी खूप फायदेशीर (Pune News) आहे.

 

दरम्यान, संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.
यात फायबर, मिनरल्स (आयर्न व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे.
त्यामुळे कॅन्सरसह (cancer) विविध आजारांसाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे निष्पण झाले (pune news) आहे.

 

Web Title :- Pune News | different kind of rice grown first time in Pune district; Useful for preventing heart attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BMC Election | भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; शिवसेना नगरसेवकाचा दावा

Aurangabad Crime | अखेर प्रा.डॉ. राजन शिंदेंच्या खुनाचं गूढ उकललं; कसं मारायचं याचा शोध घेतला Google वर!

Atul Bhatkhalkar | ‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’; भातखळकरांचा शरद पवारांना टोला