Pune News | डिजिटल भारत सक्षम होत असताना पुण्यातील डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | भारताची डिजिटल मीडियाकडे वाटचाल सुरु असताना पुण्यातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी पुण्यातील (Pune News) डिजिटल मीडियाला (Digital Media) पासेस नाकारले (Passes Denied) आहेत. यामुळे डिजिटल मिडियामध्ये नाराजी आहे.

यासंदर्भात डिजिटल मीडिया एडिटर जर्नालिस्ट असोसिएशनचे सदस्य
(Digital Media Editor Journalist Association) शरद लोणकर (Sharad Lonkar) यांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Deputy Chief Minister Devendra Fadnavis), विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao), जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Collector Rajesh Deshmukh),
जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
(PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली आता डिजिटल भारत (Digital India) सक्षम होत आहे.
यापूर्वी राजेंद्र सरग (Rajendra Sarg) नावाचे जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांनी पुण्यातील
डिजिटल मिडियाला चांगले उत्तेजन आणि सहकार्य दिले आहे.
त्यांच्यानंतर मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही असे खेदाने नमूद करीत आहे. (Pune News)

यापूर्वी झालेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत डिजिटल मिडियाला मतदान, मतमोजणी संदर्भात तसेच वेळोवेळी शासकीय स्तरावरून, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) स्तरावरून देण्यात येणारे पासेस देण्यात आलेले आहेत. यावेळी आता कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक (Pune Kasba Peth Chindhwad Bypoll Election) होते आहे. या निवडणुकीतील मतदान, मतमोजणी पासेससाठी जिल्हा माहिती कार्यालयाने फोटो आणि पासेस मागविले होते.

तथापि आज त्यांच्या कार्यालयातून डिजिटल मिडीयाला पासेस नाकारल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामागे काही कारण सांगण्यात आलेले नाही. डिजिटल मिडियाला आपण अशा प्रकारे अव्हेरू नये.
हवे तर आवश्यक ते जरूर निकष लावावेत, मात्र डिजिटल मिडियाला वार्तांकनासाठी सहाय्य करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षीत केलेल्या डिजिटल इंडिया मधील डिजिटल मिडियाला भक्कम करण्यासाठी
निराश करणार नाहीतस अशी अपेक्षा शरद लोणकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

Web Title :-  Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Traffic Updates News | मेट्रोच्या कामामुळे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

Pune Crime News | सराईत वाहनचोराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 6 गुन्हे उघडकीस