Pune News | दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट; गृहमंत्री म्हणाले – ‘शिकागोच्या धर्तीवर मुंबईत बहुमजली इमारत बांधणार’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News |महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेले मुख्यालय येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडे (yerwada central jail) असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी दिली. पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच आढावा घेतला,त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. Pune News | Dilip Walse Patil’s visit to Yerawada Central Jail; Home Minister says – ‘Multi-storey building to be built in Mumbai on the lines of Chicago’

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे (director general of police sanjay pandey) , अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुनील रामानंद (additional director general of police sunil ramanand), उपमहानिरीक्षक योगेश देसाई (Deputy Inspector General of Police Yogesh Desai), अधीक्षक यु. टी. पवार (Superintendent of Police U. T. Pawar) उपस्थित होते.

गृहमंत्री पाटील पुढे म्हणाले, मुंबई मध्ये शिकागोच्या धर्तीवर बहुमजली इमारत बांधण्यात येईल.
आटपाडी येथे पुरुष बंद्यासाठी खुली वसाहत आहे.
त्याचप्रमाणे महिला बंद्यासाठी खुली वसाहत निर्माण करण्यात येईल.
कोरोनाच्या काळात न्यायालयीन प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्यासाठी बंद्याना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करावे.
जेणेकरून शासनाचा बंदी न्यायालयात ने- आन करण्याचा खर्च आणि मनुष्यबळ वाचेल, असेही ते म्हणाले.

यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते 2019-20 सांख्यिकी पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
श्री वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी कारागृहात कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद (additional director general of police sunil ramanand) यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Jumping Rope Benefits | दररोज 30 मिनिटे दोरी उड्या मारा, शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळतील; जाणून घ्या होणारे लाभ

Dombivli Crime | किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांत तुंबळ हाणामारी; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Social Media | महिलेची ऑफर ! 2 दिवसांसाठी सासूचा बॉयफ्रेंड व्हा, 72 हजार घ्या

Breast Milk | ‘या’ 10 कारणांमुळे ‘ब्रेस्टमिल्क’ची निर्माण होते कमतरता, बाळाला नाही मिळत पुर्ण पोषण; जाणून घ्या