Pune News : DP तील रस्त्यांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सहवास सोसायटी, हॅपी कॉलनीतील नागरिकांसह अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डीपीतील रस्त्यांची काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सहवास सोसायटी, हॅपी कॉलनीतील नागरिकांसह अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी. यावेळी भाजपचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले की, पुढील पंधरवड्यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जागा मालकांची बैठक घेऊन भूसंपादनातील अडचणी दूर करुन सर्व विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात येइल, असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार कोथरूडमधील विविध प्रश्नांचा अभ्यास करुन ते सोडवण्यासाठी नागरिक,लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वयातून प्रयत्न सुरु आहेत. या अनुषंगाने आज प्रभाग 13 मधील डी पी रस्त्यांचे व अन्य प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ता व समस्या निवारणाचे समन्वयक संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने आज सर्व संबंधितांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भाजप सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, प्रभाग सरचिटणीस ॲड.प्राची बगाटे, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण यांच्यासह मनपा उपायुक्त (भूसंपादन ) डॉ. लाभशेटवार, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे, डी पी चे सुधीर कदम, वारजे कर्वेनगर कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी संतोष वारुळे, तांदळे, खान व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वनदेवी मंदिरासमोरुन येणारा 20 मीटर डी पी रस्ता, गोसावी वस्तीतून हॅपी कॉलनीतून जाणारा 20 मीटर डी पी रस्ता, सहवास सोसायटीचे सहा मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबत आलेल्या नोटीशीवरच्या शंकांचे निरसन करण्यात आले. रेवती एनक्लेव्ह येथील नागरिकांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी व तेथे होणारे अपघात, भुजबळ बागेत टाकला जाणारा कचरा, क्षिप्रा चौकात होणारी वाहतूक कोंडी यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हे सर्व प्रश्न प्रशासकीय स्तरावर सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत व योग्य पाठपुरावा करु असे नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

आम्हाला चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपेक्षा असून ते आमचे प्रश्न सोडवतील अशी खात्री वाटते असे सोसायटी मधील नागरिकांनी सांगितले. यावेळी सहवास सोसायटी मधील योगिनी कर्वे, डॉ. प्रमोद मुळे, मेघराज सोसायटीचे बिपीन कवठेकर, मयूर कुलकर्णी, प्रकाश अवचट, नितीन गोखले, आसावरी, विभावरी, धनलक्ष्मी सोसायटीचे प्रभाकर उदार, सुधीर पुरंदरे, जगदीश डिंगरे, प्रबोध जोशी, उदय शिंदे, सचिन गुजर, शैलजा पाटणकर, म्हाळसकांत खळदकर, तर रेवती एनक्लेव्हचे अजीत महाबळ, श्रीराम कोणकर, जयंत करमरकर, अवधूत बापट, विश्वास वैद्य, हेमंत आठवले, सिद्धार्थ महाबळ, निलेश माळवदकर, अश्विनी सोसायटीचे शिवाजी अत्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.