Pune News | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 250 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप; निलेश शिंदेंचं कार्य कौतुकास्पद – प्रशांत जगताप

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News|आपल्या वापरात नसलेले पण इतरांना उपयोगी ठरेल अशा अनेक वस्तू आपल्याकडे अडगळीत पडून असतात. ती वस्तू गरजवंताला मिळाली तर त्याचे जीवन बदलून जाते. यावर सखोल विचार करुन शहरभरातून २५० सायकल गोळा करत त्या गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे निलेश शिंदे (NCP Youth Congress Pune City Vice President Nilesh Damodar Shinde) यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या विकासाला गती मिळेल असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune City President Prashant Jagtap) यांनी व्यक्त केले. Pune News | Distribution of bicycles to 250 needy students on the occasion of Ajit Pawar’s birthday; Nilesh Shinde’s work is admirable – Prashant Jagtap

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (deputy chief minister ajit pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त (birthday celebration) उत्सव कार्यालय, कोथरुड (utsav mangal karyalay kothrud) येथे आयोजित केलेल्या सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी जगताप प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी उपमहापौर दीपक मानकर (former deputy mayor deepak mankar) ,पेडल मिशनचे संस्थापक आनंद वांजपे (Anand Wanjpe, founder of Pedal Mission), राष्ट्रवादी कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने, हर्षवर्धन मानकर, संतोष डोख ,महेश हांडे, ज्योती ताई, नवनाथ खिलारे, धनंजय पायगुडे, सूर्यवंशी,दिलीप कानडे, सीताराम तोंडे पाटील, सचिन जोरी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष निलेश दामोदर शिंदे, तृप्ती निलेश शिंदे, त्रिमुर्ती मित्र मंडळ आणि मंदार शिंदे यांनी केले.समाजातील गरजवंतांसाठी काही करायची इच्छा असते परंतु खरा गरजवंत शोधणे व त्याला आवश्यक असलेली वस्तू देणे महत्त्वाचे असते.

Pune News | Distribution of bicycles to 250 needy students on the occasion of Ajit Pawar's birthday; Nilesh Shinde's work is admirable - Prashant Jagtap

संयोजक निलेश शिंदे म्हणाले की, सायकल वाटपाची ही संकल्पना आनंद वांजपे सर यांच्यामुळे मिळाली. लोकांना केलेल्या आवाहनातून २५० सायकल मिळाल्या.
त्या दुरुस्त करुन उपमुख्यमंत्री अजित दादांच्या वाढदिवसाचे निमित्ताने वाटप करण्यात येत आहे.
आणखी विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली आहेत.
त्यांनाही सायकल देण्याचे काम आम्ही नक्की करु. 2001 पासून पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे.
नजीकच्या काळात महानगरपालिकेवरती राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत.

आनंद वांजपे म्हणाले की, एक मुलगी तीची जुनी सायकल देवून नवीन विकत घ्यायला आली होती.
तीला व तीच्या वडीलांना आम्ही आमच्या मनातील संकल्पना सांगितली.
त्यांना ती खुप आवडली आणि तीने आम्हाला गरजू विद्यार्थ्यासाठी भेट म्हणून सायकल दिली.
तीने दिलेल्या सायकलपासून आम्ही हा उपक्रम सुरु केला. त्याला खुप यश मिळत आहे.
वैभव कोठुळे यांनी सूत्रसंचलन केले. तृप्ती शिंदे यांनी आभार मानले.

Web Title : Pune News | Distribution of bicycles to 250 needy students on the occasion of Ajit Pawar’s birthday; Nilesh Shinde’s work is admirable – Prashant Jagtap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weather Forecast | आज पुण्यासह 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या कशी असेल कोकणातील स्थिती ?

Vaccination Under 18 | व्हॅक्सीनसंबंधी आली खुशखबर ! सप्टेंबरपासून सुरू होईल 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे लसीकरण !

BJP MLA Suresh Dhas | भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात महिलेची तक्रार, धस यांच्यासह 38 समर्थकांवर FIR, बीडमध्ये खळबळ