Pune News | ‘फटाकेच नको,विमाने उडवा’ ! कोथरुड येथील स्वप्नशिल्प सोसायटीचा अनोखा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | दूरवरून घुमत येणारा विमानाचा आवाज ऐकला कि अगदी सहजच प्रत्येकाची नजर आभाळात डोकावते. आणि एखाद्या फायटर विमानाचा कानठळ्या बसवणारा आवाज असला तर बालचमू अगदी पळत पळत घराच्या गॅलरीत जाऊन आवाजाच्या दिशेन त्या विमानाचा शोध घेतात. कधी मधी निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर नजर टाकली आणि एखादी पांढरी रेषा दिसली कि ‘ अरेच्चा इथून उंचावरून जाणार एखाद विमान गेलेलं दिसतय’ अस अगदी हमखास मनात येत.

 

आभाळात उडणाऱ्या या मशीन्स ने मानवाला अगदी अनंतकाळापासून भुरळ घातली आहे. पुराणातली विमानांची वर्णने हे केवळ काल्पनिक होती का सत्यात तशी उड्डयन यंत्रे होती यावर अभ्यासकांचे शोध निबंधच्या निबंध प्रकाशित झाले असले तरी विमानाचे वाटणारे आकर्षण हे काही आबालवृद्ध लपवून ठेवू शकलेले (Pune News) नाहीत.

 

विमान विद्येच्या मागचं शास्त्र उमलत्या वयात समजून घेण्याची संधी स्वप्नशिल्प मधील मुलांना आणि सर्व रहिवाश्यांना मिळाली ती २४ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘फटाके च नको विमाने उडवा’ या उपक्रमाद्वारे. दिनक २४ ऑक्टोबर,रविवार रोजी स्वप्नशिल्प सोसायटी (swapnashilp society kothrud) मध्ये सकाळी ११ ते १ या वेळेत हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. दीपावलीच्या सणाच्या (diwali 2021) पार्श्वभूमीवर पर्यावरणास हानी पोचविणाऱ्या फटाक्यांपेक्षा बुद्धी आणि सर्जनशीलतेला चालना देणारी विमाने उडवा असा संदेश याद्वारे देण्यात आला.

 

सोसायटीच्या नवीन झालेल्या आकर्षक वृंदावन गार्डन मध्ये सदानंद काळे (Sadanand Kale),
अथर्व काळे (Atharva Kale) कुटुंबीय यांनी विमानांच्या प्रतीकृतीन्द्वारे या विषयावर सर्वांशी संवाद साधला.
सदानंद काळे यांनी सुखोई सारख्या फायटर जेट पासून अनेक विमानांच्या उडणाऱ्या प्रतिकृती बनविलेल्या आहेत.
या प्रतिकृतींच्या हवाई कसरतीद्वारे त्यांनी अगदी वायुदलातील अधिकार्यांना सुद्धा अचंबित केले आहे.

विमाने कशी बनतात, कशी उडतात, हवेत कश्या कसरती करू शकतात याचे त्यांनी अगदी सहज सोप्या भाषेत सर्वांसाठी छोटेसे अभ्याससत्र घेतले.
त्यातून बालचमुंची या विषयातली ज्ञान लालसा तर भागलीच पण आपणही या क्षेत्रात काही करावे अशी खूणगाठ त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली.
काळे आणि त्यांचे सहकारी यांनी विमानाच्या प्रतिकृतींचे उड्डाण करून दाखवले आणि त्या प्रतिकृतींच्या कसरतीसुद्धा करून (Pune News) दाखवल्या.
आभाळात उंच उडणाऱ्या विमानाच्या लहान बाहुल्या आपल्या अगदी जवळून उडताना पाहणे
हि खरीखरच एक पर्वणी होती आणि स्वप्नशिल्प च्या व्यवस्थापन समितीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ती सर्वांसाठी उपलब्ध करून दिली.
हा कार्यक्रम आयोजित करण्यास सोसायटीचे सेक्रेटरी प्रशांत भोलागीर (Prashant Bholagir)
आणि कमिटी सदस्य विवेक विप्रदास (Vivek Vipradas) यांनी पुढाकार घेतला.

 

Web Title :- Pune News | ‘Don’t firecrackers, fly planes’! A unique initiative of the swapnashilp society kothrud pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक

Ratan Tata TCS RIL | रतन टाटा यांच्या TCS आणि रिलायन्सचे झाले 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान, जाणून घ्या कसे

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 98 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी