Pune News | डॉ. रिता शेटीया यांना अर्थशास्रातील पीएचडी पदवी प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | धनकवडी येथील डॉ. रिता मदनलाल शेटीया (Dr. Rita Madanlal Shetiya) यांना पुणे, गुलटेकडी येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची (Tilak Maharashtra University) अर्थशास्र् (Economics) या विषयातील विद्यावाचस्पती (PhD) पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ऑफ इंडिया अमंग द ब्रिक्स कन्ट्रीज (2006 – 2017)’ हा त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. ज्योती पाटील (Dr. Jyoti Patil) यांचे मार्गदर्शन लाभले. (Pune News)

याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील अर्थशास्र् विभाग प्रमुख डॉ. प्रवीण जाधव (Dr. Praveen Jadhav) आणि डॉ. निलेश लिंबोरे (Dr. Nilesh Limbore) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. सी. ए. सुरेश रानडे, आर. बी. आय. च्या सेवानिवृत्त अधिकारी सुहासिनी बिवलकर, निवेदिता माझिरे, पदमश्री लीला पुनावाला आणि फिरोझ पूनावाला यांचे सहकार्य लाभले. (Pune News)

वेळोवेळी प्रेरणा, मार्गदर्शन, साहाय्य, सहकार्य आणि खंबीरपणे पाठीशी उभी राहिली
आई एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया आणि त्यांचे स्व. वडील मदनलाल शेटीया यांचे आशीर्वाद या
सगळ्यांच्या मार्गदर्शनानेच हा टप्पा मी पार करू शकले. असे डॉ. रिता शेटीया यांनी सांगितले.
तसेच हि पीएचडी पदवी आई – वडिलांना समर्पित केल्याचे सांगितले

Web Title :-Pune News | Dr. Awarded PhD degree in Economics to Rita Shetia