Pune News : कात्रज स्टॅन्डवर 2 पीएमपीमध्ये चिरडला गेला चालक, दोघांविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पीएमटी बस चालकांच्या ड्रायव्हिंगचा पुणेकरांना अनेकवेळा फटका बसला असून, दोन दिवसांपूर्वी मात्र पीएमटी चालकालाच चक्क कात्रज पीएमटी स्टॅण्डच्या आतच एका चालकाला दोन बसच्यामध्ये चिरडल्याचा खळबळ उडवून देणारा प्रकार समोर उजेडात आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घातपात आहे का या दृष्टीने तपास केला जात आहे.

अमित शिवाजी मांढरे (रा. पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी दुसऱ्या एका चालकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांढरे हे पीएमटीचे बस चालक आहे. तर फिर्यादी देखील पीएमपी चालक आहे. दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी ते ड्युटीवर आले होते. त्यावेळी त्यांना दिलेली पीएमटी बस वर्कशॉपमध्ये आणण्यासाठी जात होते. त्यावेळी मात्र बिल्डिंग शेडमधून पायी जात असताना अचानक दोन बस चालकांनी त्यांची बस रिव्हर्स घेतली. त्या दोन बसमध्ये अमित मांढरे यांना चिरडून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकी बस चालक कोणती असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यात प्रथम 4 बस असल्याचे सांगितले होते. पण नंतर दोन बस असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान हा काही घातपात आहे का, या दृष्टीने तपास केला जात आहे.