Pune News | मेट्रो व ठेकेदाराच्या वादात पुणेकर त्रस्त, कर्वेनगर भागातील अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यात मेट्रोची कामे (Pune Metro Work) अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला तरी याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कर्वेनगर भागात (Karve Nagar) खोदाई करण्यात आली आहे. तसेच मेट्रोची कामे अर्धवट असून मेट्रो व ठेकेदाराच्या वादामुळे ही परिस्थिती (Pune News) उद्भवली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर (BJP Spokesperson Sandeep Khardekar) यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना निवेदन दिले आहे.
संदीप खर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मेट्रोच्या अर्धवट कामांचा फटका नागरिकांना व पुणे मनपाला देखील बसत आहे. हे काम मागील अनेक दिवस अर्धवट अवस्थेत असून मेट्रो व ठेकेदाराच्या वादामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे (Pune News) समोर आले आहे. मनपाने वारंवार बैठक घेऊन, नोटीस देऊन देखील मेट्रोच्या बेफिकीर वृत्तीमुळे आता मनपा तेवढा भाग सोडून रस्ता डांबरीकरण करणार असल्याचे समजते. हे कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय करणारे व चुकीचे आहे. यात आपण लक्ष घालावे अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.
हीच परिस्थिती विठ्ठल मंदिर रस्त्यावर अत्यंत वाईट आहे.
या ठिकाणी अवजड विद्युत वाहिन्या (Power Lines) असून ते काम थंडावल्याचे चित्र आहे.
अशीच परिस्थिती राहुलनगर येथे देखील आहे. तरी ही कामे त्वरित पूर्ण करावीत व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.
ही कामे पूर्ण करूनच संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची प्रत पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (Pune Metro Director Atul Gadgil)
आणि पथ विभागाचे (Road Department) मुख्य अभियंता व्ही.जी. कुलकर्णी (Chief Engineer V.G. Kulkarni)यांना दिली आहे.
Web Title : Pune News | Due to the dispute between Metro and the contractor, Pune residents are suffering, demand for partial completion of works in Karve Nagar area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा