Pune News : अबॅकस स्पर्धेत जिनियस चॅम्प्सची गरूडझेप; विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये होतो मोठा बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अबॅकसच्या अभ्यास पद्धतीमुळे मुलांच्या दैनंदिन अभ्यासामध्ये मोठा बदल जाणवतो. विद्यार्थी अतिशय हुशारीने आकडेमोड करतात. त्यामुळे मेंदूविकास होण्यास नैसर्गिकपणे मदत होते, असे संस्थेच्या संयोजिका दर्पणा शुक्ल यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड (रहाटणी) शाखेतून जिनियस चॅम्प्स अकॅडमीतर्फे अबॅकस स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विविध शाखांमधून 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये गरूडझेप घेतली आहे. अभ्यासामध्ये हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अबॅकस स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते. या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, आर्वी वाडने, श्रीपाद भिसे आणि तनया बेर्डे यांनी उत्तम यश संपादन केले.

त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संयोजिका दर्पणा शुक्ल यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निशुल्क अभ्यासाकरिता डॉ. जयश्री घाटबांधे यांच्याशी 9423631238 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.