Pune News | इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने 19 वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने इकोल स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने १९ वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोमवार ३० ऑगस्ट पासून ८ सप्टेंबर पर्यंत रंगणार आहे, अशी माहिती इकोल स्पोर्टस् फाऊंडेशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे संचालक दर्शन जिंदल (Darshan Jindal, President of Ecole Sports Foundation and Director of the competition) यांनी पत्रकार परिषदेमध्ये (Pune News) दिली.

यावेळी इकोल स्पोर्टस् फाऊंडेशनचे सचिव सयन सेनगुप्ता (Secretary Sayan Sengupta), संचालक महेश देशमुख (Director Mahesh Deshmukh) , प्रत्यूष भारतीय, लायन क्लब ऑफ पुणे, मास्टरमाईंडच्या अध्यक्षा नसरीन एंजलर, अंशुल शर्मा, पोरस अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. जिंदल पुढे म्हणाले, विजेत्या संघास व्ही. के. जिंदल स्मृती करंडक तर उपविजेत्या संघास पं. शिवदत्त शास्त्री स्मृती करंडक देवून गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत पीवायसी (PYC), डेक्कन जिमखाना (deccan gymkhana), पूना क्लब (Poona Club), डीव्हीसीए (DVCA), ब्रिलियंट, अँबिशियस, केडनस, २२ यार्ड्स, मेट्रो व जिल्हा संघ असे १० संघ सहभागी होणार असून ही स्पर्धा राऊंड रॉबिन प्रकारात होणार आहे. ही स्पर्धा पुना क्लब, येवलेवाडी, पीवायसी, डेक्कन जिमखाना, डीव्हीसीए, बारणे या ठिकाणी होणार आहे. अशी माहिती सयन सेनगुप्ता (Sayan Sengupta) यांनी दिली.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

स्पर्धेला अंकार पॅनासोनिक लाईफ सोल्युशन, सेव्हन बाय एमएस धोनी, लायन क्लब ऑफ पुणे, मास्टरमाईंड आदींचे सहकार्य लाभले असून गुणवत्ता असणार्‍या खेळाडूना याद्वारे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सामनावीर, मालिकावीर, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज अशी विविध पारितोषिके सेव्हन
बाय एमएस धोनी संस्थेच्या वतीने देण्यात येनार आहेत, अशी माहिती महेश देशमुख यांनी दिली.

अलिकडे युवा पिढीचा मैदानी खेळातील रस कमी होत चालला असून मोबाईच्या माध्यमातून विविध गॅझेटस् त्यांच्या हाती आली आहेत.
या पिढीमध्ये आरोग्य व खेळाच्या माध्यमातून सामाजिक जिवनाची मुल्ये रुजविण्यासाठी विविध क्षेत्रातील
मित्रमंडळींनी एकत्र येत इकोल स्पोर्टस् फाउंडेशनची स्थापना करून युवापिढीसाठी खेळांची संधी उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे.
क्रिकेट स्पर्धांचे हे पहिलेच वर्ष असून यापुढील काळामध्ये मुलींच्या क्रिकेट मॅचेस व अन्य मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– सयन सेनगुप्ता.

Web Title : Pune News | Ecole Sports Foundation hosts one day cricket tournament for under-19s