Pune News | कात्रज येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून चौकशी सुरु

पुणे : Pune News | कात्रज येथील ओंकार सोसायटीमध्ये (Omkar Society, Katraj) उच्चदाबाच्या उपरी वीजवाहिनीचा धक्का लागून जखमी झालेल्या ऋषिकेश मंजूनाथ पुजारी (Rishikesh Manjunath Pujari) या १४ वर्षीय बालकाचा उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या जिल्हा विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी सुरु आहे. त्यांचा तांत्रिक निरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून (Mahavitaran) दोषींविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच मृताच्या कुटुंबियास आर्थिक मदत करण्यात येत आहे. (Pune News)

ओंकार सोसायटीच्या रस्त्याच्या कडेने उच्चदाबाची २२ केव्ही कात्रज-कोंढवा (Katraj- Kondhwa) वीजवाहिनी गेली आहे. गेल्या रविवारी (दि. २३) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास या उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेच्या धक्क्याने ऋषिकेश जखमी झाला होता. याबाबत महावितरणच्या पद्मावती विभाग कार्यालयाकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयास कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे विद्युत निरीक्षकांनी या जागेची पाहणी केली आहे. त्यांच्याकडून तांत्रिक निरीक्षण अहवाल लवकरच प्राप्त होईल. (Pune News)

दरम्यान, महावितरणच्या संबंधित अभियंत्यांनी या जागेची पाहणी केली आहे.
यामध्ये उपरी तारमार्ग स्वरुपाची असलेल्या वीजवाहिनीचे रस्त्याच्या बाजूच्या जमिनीपासूनचे अंतर योग्य
असल्याचे दिसून आले. वीजवाहिनी असलेल्या ठिकाणच्या रस्त्यालगत १० ते १२ फूट उंच भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीच्या आतील बाजूस भराव टाकल्यामुळे वीजवाहिनीचे जमिनीपासूनचे अंतर कमी झाल्याचे निदर्शनास आले. भिंतीच्या आतील परिसर वापरात नसल्याने तेथे झाडेझुडपे वाढलेली आहे. सोसायटीच्या आतील बाजूने ऋषिकेश भिंतीवर गेला असावा व उपरी वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसला असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

Web Title :-  Pune News | Electrical inspectors begin investigation in the death of a child in Katraj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा