Pune News | ‘जे पालक पैसे देण्यास तयार होतील त्यांचेच अर्ज पात्र करा’ ! गट शिक्षणाधिकार्‍याने दिल्या सुचना, ACB च्या तपासातून झालं स्पष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune News | शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई-RTE) प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणात अटकेत असलेले हवेली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे (Group Education Officer Ramdas Walzade) यांनीच १८ अपात्र केलेल्या अर्जातून जे पालक पैसे देण्यास तयार होतील त्यांचेच अर्ज पात्र करण्याच्या सूचना दिल्याचे ACB पोलिसांना तपासातून (Pune News) दिसून आले आहे.

विशेष न्यायधीश एस.बी हेडाऊ यांनी या प्रकरणात अटक दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रामदास शिवनाथ वालझाडे (वय ५०, गटशिक्षणधिकारी, वर्ग २, पंचायत समिती ता. हवेली) आणि विकास नंदकुमार धुमाळ (वय ४०, प्रवेश पडताळणी समिती सदस्य, पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी) अशी पोलिस कोठडी झालेल्यांची नावे आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मिळणा-या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिका-यासह दोघांना अटक केली आहे.

तक्रारदार यांच्या मुलीचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अन्वये हडपसर येथे एका शाळेत लॉटरी पद्धतीने मिळणा-या प्रवेश यादीत नाव समाविष्ट करायचे होते.
त्याकरिता कागदपत्रे तपासून आॅनलाईन मान्यता देण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता.
ही मान्यता देण्यासाठी आरोपी विकास धुमाळ याने गटशिक्षणाधिकारी वालझाडे यांच्यासाठी ५० हजारांची लाचेची मागणी केली होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार मिळालेल्या प्रवेशाला कागदपत्रे तपासून आॅनलाईन मान्यता देण्यासाठी त्यांनी लाच घेतली .
हवेली पंचायत समितीच्या बाहेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
याप्रकरणी, दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgardan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

आरोपींकडे जे दफ्तर मिळाले त्यात 18 अपात्र केलेले प्रवेश अर्ज आढळून आले.
त्यातील ब-याच प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याचे धुमाळ यांनी मान्य केले आहे.
त्यामधील हिस्सा वालझाडे यांना दिल्याचे धुमाळ यांनी सांगितले आहे.
यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? त्याचा तपास करायचा आहे.
त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी ॲड रमेश घोरपडे (Avt Ramesh Ghorpade) यांनी केली.
पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त विजयमाला पवार (ACP Vijaymala Pawar) या करीत आहेत.

 

Web Title : Pune News | ‘Eligible only for parents who are willing to pay’! The instructions given by the group education officer became clear from the ACB’s investigation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NCP – Shiv Sena | सेना-राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर; बीडमधील आमदार पुतण्यावर काकाचे आरोप

Home Loan Online Application | ‘होम लोन’साठी ऑनलाइन अप्लाय करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते नुकसान

Anti Corruption | महिलेकडे 30,000 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक