Pune News | पुण्याजवळील चाकण येथील ‘या’ किल्ल्यावरील हटवले अतिक्रमण

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुण्यातील (Pune News) चाकण (Chakan) जवळील संग्रामदुर्ग किल्ल्यावरील (Sangramdurga Fort) अतिक्रमण हटवण्यात आले आहे. या ऐतिहासिक किल्ल्यावर (Historical Place) केलेल्या अनधिकृत बांधकामामूळे या वास्तूचे नुकसान होत होते. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून (Archaeological Survey of India) पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. (Pune News)

संग्रामदुर्ग या ऐतिहासिक वास्तूवर अनेक ठिकाणी पत्राशेड उभे करण्यात आले होते. हे पत्राशेड या ऐतिहासिक वास्तू मधून हटवले पाहिजे अशी मागणी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने पुरातत्व विभागाकडे करण्यात आली होती. अखेर चाकण नगर परिषद (Chakan Municipal Council) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri-Chinchwad Police) सहकार्याने हे अतिक्रमण बुधवारी हटवण्यात आले. (Pune News)

पुणे जिल्ह्यात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू असून त्यांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांमुळे अनेक फेरीवाले तिथे फिरत असतात, तर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून तिथे दुकाने टाकण्यात आली आहेत. अशा अतिक्रमणामुळे या वास्तूंचे नुकसान होते. ते टाळता यावे म्हणून अनेक इतिहास प्रेमी अशा अतिक्रमाणाविरुद्ध आवाज उठवत असतात.

Web Title :-  Pune News | encroachment of sangramdurg fort in chakan area of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update