Pune News | ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून; जी २० परिषदेत यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतील’ – खासदार विनय सहस्त्रबुद्धे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करताना या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन त्यातून मार्ग काढण्यासाठीच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जी २० परिषदेमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे करावयाच्या उपाययोजना यावर देखिल भर राहील, अशी माहिती भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे (BJP MP Vinay Sahasrabuddhe) यांनी दिली. (Pune News)

 

जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. यानिमित्ताने पुढील वर्षभर जी २० मधील देशांसह भारताने या परिषदेला पाहुणे म्हणून निमंत्रीत केलेल्या ४३ देशांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत. या परिषदेबद्दल माहिती देण्यासाठी भाजप शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सहस्त्रबुद्धे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, या परिषदेच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या बैठका होणार आहेत. १८ व्या जी २० परिषदेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास, विविधता आणि लोकशाही हे विषय घेतले आहेत. लोकशाही कशी असावी याची भूमिका पंतप्रधानांनी वेळोवेळी विषद केली आहे. यासोबतच जागतिक पर्यावरणा विषयी देखिल भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केली असून याची संपुर्ण जगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. दक्षिण गोलार्धाचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारत पुढे येत आहे, ही संपुर्ण भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. (Pune News)

जी २० परिषदेमध्ये जागतिक पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी असताना राज्य शासनाने पर्यावरणाला बाधा ठरणार्‍या प्लास्टिक वस्तू वापरावरील निर्बंध शिथिल केले आहेत.
प्रामुख्याने यूज ऍन्ड थ्रो प्लास्टिकच्या थाळ्या, कप, चमचे याबाबत सहस्त्रबुद्धे यांचे लक्ष वेधले.
यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, की पर्यावरण आणि विकास हे दोन्ही हातात हात घालून चालतात.
या व्यवसायावर असलेल्या रोजगाराचा विषय देखिल तितकाच महत्वाचा आहे.
पर्यावरण आणि विकासाचा एकत्रित विचार करताना असे अनेक अडचणींचे मुद्दे पुढे येणार आहेत.
यावरच आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करुन सार्वमताने मध्यम मार्ग काढून प्रबोधन करावे लागणार आहे.

 

Web Title :- Pune News | ‘Environment and development are interdependent; Efforts will be made to find a way in the G20 conference’ – MP Vinay Sahastrabuddhe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…