Pune News | ‘सगळे चोर आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे’, राजू शेट्टींचा सर्वपक्षीय कारखानदारांवर निशाणा

पुणे : Pune News | सरकार बदलले मात्र कारखाना हडप करण्याची प्रवृत्ती बदलली नाही. एखाद्या कारखान्यावर किती कर्ज आहे हे सभासदांना कळालं पाहिजे. एखादा माणूस दारू पितो म्हणून त्याची प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकत नाही, तसेच कारखान्याचे संचालक चांगलं काम करत नाहीत, म्हणून तो विकणे योग्य नाही. सगळे चोर आहेत चोरांना शासन झालं पाहिजे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी यांनी (raju shetty) आज सर्वपक्षीय कारखानदारांवर पुण्यात (Pune News) केली आहे.

20 व्या साखर परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरवा संदर्भात माहिती देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी (Pune News) बोलत होते.

जरंडेश्वर कारखान्यासोबत (jarandeshwar sugar factory) 42 आणखीन कारखाने आहेत, त्यावर देखील किरीट सोमय्या यांनी बोलायला हवं, गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं आणि सोईच मागे ठेवायचं असं करू नये.
आज सोमय्या करत असलेले काम मी अनेक वर्षांपूर्वी केलेलं आहे, असा टोला यावेळी शेट्टी यांनी सोमय्यांना (kirit somaiya) लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात कमी पडत आहे.
त्यामुळे सरकारवर माझी नाराजी आहे, ती दहा वीस एकरसाठी नाही, मला शेतकऱ्यांशिवाय कोणाशी देणंघेणं नाही.
आजवर मी शेतकऱ्यांशी कधीही प्रतारणा केलेली नाही. महाविकास आघाडीसोबत राहण्याचा पुनर्विचार करत आहोत.
सर्वजण मिळून निर्णय घेऊ, असंही यावेळी शेट्टी म्हणाले.

हे देखील वाचा

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Everyone is a thief, they must be ruled’, Raju Shetty targets all-party manufacturers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update