Pune News | बलात्कार करणाऱ्या आरोपींना त्वरित फाशी द्या, युवती महिला प्रतिष्ठानाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युवती महिला प्रतिष्ठानच्या संघटना कडून असे सांगण्यात आले की पुणे (Pune News), पिंपरी (Pimpri), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai) या सर्वच महानगरांमध्ये स्त्रिया आणि मुली सुरक्षित नाहीत. गेल्याच आठवड्यात पुण्यातील (Pune News) दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत गतिमंद मुलीवर चौघांनी केलेला बलात्कार (Rape), पिंपरी येथे वडिलांनी मुलीवर केलेला बलात्कार, साकिनाका, मुंबई येथील महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्यावर चाकूने वार केले आणि तिच्या गुप्तांगात रॉड खूपसून तिला भयंकर गंभीर जखमी केले.

पुणे स्टेशन (Pune station) येथील सहा वर्षांच्या मुलीवर रिक्षाचालकाने मार्केट यार्ड (Market Yard) येथे पडक्या इमारती मध्ये नेऊन पहाटेच्या सुमारास बलात्कार केला. पुणे स्टेशन जवळ परप्रांतीय असणाऱ्या चौदा वर्षांच्या मुलीवर सहा जणांनी केलेल्या सामूहिक बलात्कारांतर (Gang rape) अवघ्या राज्याची मान खाली गेली आहे. जर राज्यातील प्रमुख महानगरांची परिस्थिती स्त्रियांसाठी इतकी असुरक्षित असेल, तर राज्याच्या ग्रामीण आणि खेड्यातील परिस्थितीमध्ये अशा घडून गेलेल्या घटना वाच्यताही होत नसेल? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

आज प्रत्येकाच्या घरात असलेल्या स्त्रीला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
2 वर्षाच्या मुली पासून ते 80 वर्षाच्या आजी पर्यंत कोणतीही स्त्री सुरक्षित नाही.
स्त्रियांचे अपहरण करणे, त्यांच्यावर आळीपाळीने सामुहिक बलात्कार करणे,
त्यांना वेदनादायी मारहाण करणे, गंभीर जखमी करणे, खून करण्याच्या उद्देशाने जखमी करणे
अशा घटना दर दिवशी मोठ्या संख्येने पाहायला मिळत असताना या राज्यातील स्त्रिया असुरक्षित आहेत, याची प्रकर्षाने जाणीव होते. (Pune News)

एकेकाळी मध्यरात्री पुणे-मुंबईच्या रस्त्यावर सुरक्षितपणे वावरनाऱ्या स्त्रियांच्या मनात या सर्व घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
तसेच अशा घटनांना वेळीच पायबंद बसून निर्भयतेने मुलींना समाजात वावरता यावे,
यासाठी युवती महिला प्रतिष्ठान संघटनेकडून पुणे यांच्याकडून तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणार आरोपी यांना त्वरित फाशी देण्याची मागणी केली आहे.

युवती महिला प्रतिष्ठानच्या (Yuvati Mahila Pratishthan) वतीने संस्थापक अध्यक्षा रेश्मा पितांबर विभुते (Reshma Pitambar Vibhute) यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिस आयुक्त (Pune City Police Commissioner) यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना युवती महिला प्रतिष्ठान चे पदाधिकारी मयुरी देशमाने, मोनिका गलांडे, आशा घाडगे, सुषमा खंडागळे, मनीषा गोलांडे, सृष्टी विभुते उपस्थित होते.

Web Title :- Pune News | Execute the rapists immediately, a statement to the Commissioner of Police on behalf of the Yuvati Mahila Pratishthan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलीयन डेज सेल’ मध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी; मिळेल 80 % पर्यंत सवलत

Electricity Bill | ग्रामपंचायतींच्या वीजबिलांची थकबाकी कोटींच्या घरात, न भरल्यास ‘अंधार’

Nashik Anti Corruption | ‘आयपीएल’ बेटिंगचा धंदा सुरळीत ठेवण्यासाठी 3 लाखाची लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात