Pune News : औंध परिसरात पुर्ववैमनस्यातून तरूणाला फायटरने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – औंध परिसरातल्या संजय गांधी वसाहत येथे पूर्वीच्या वादातून तरुणाला फायटरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात अविनाश राजेंद्र कांबळे (वय 21) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून आकाश कैलास शेलार (रा. औंध) याच्यावर चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी तरुणांची तीन महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. गुरुवारी तरुण मित्रासोबत बोलत उभा होता. यावेळी आरोपी हा त्या ठिकाणी आला. त्याने त्याच्या चेहऱ्यावर फायटरने जबर मारहाण केली. या भांडणात तरुणाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हरवली आहे. अधिक तपास चतुःश्रुंगी पोलिस करत आहेत.