Pune News – एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याबाबत शरजिल उसमानी विरोधात FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भारतीय युवा जनता मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे (वय 28) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात आयपीसी १५३ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला होता. यादरम्यान अनेक मान्यवर या एल्गार परिषदेत संबोधित करण्यास आले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी हे देखील आले होते. 6 सत्रात ही परिषद पार पडली. यावेळी पाचव्या सत्रात उस्मानी यांनी भाषण केले. पण त्यावेळी उस्मानी यांनी भडकावू भाषण केले. ज्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे भाषण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच भारतीय न्यायव्यवस्था, कायदे मंडळ आणि प्रशासकीय व्यवस्थेवर विश्वास नसल्याचे देखील म्हंटले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या विधानाने राज्यात खळबळ उडवून दिली असून, त्याचे तीव्र पडसाद देखील उमटले आहेत. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.