Pune News : कोरोनावरील प्रतिबंधक लस बनविणार्‍या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग; 10 फायर गाड्या, 100 अग्नीशमनचे जवान हे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र त्याठिकाणी अद्याप तरी अग्निशमन दलाच्या फायर गाड्या पोहचलेल्या नाहीत. आग कशी लागली हे समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या रवाना करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाने सांगितले की आग सिरम इन्स्टिट्यूट येथे नवीन युनिटमध्ये आग लागली आहे. सिरमने नुकतीच कोरोनावरील प्रतिबंधक लस तयार केली. त्यानंतर त्यांची जगभरात ओळख निर्माण झाली आहे.

 

https://www.instagram.com/p/CKTZnvzplW3/?igshid=fvxpco0u90ko

मांजरीच्या साईडला असणाऱ्या नवीन युनिटमध्ये ही आग लागली आहे. त्याचे स्वरूप भीषण असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
Covid-19 Vaccine बनवीत असलेल्या युनिट शेजारीच असलेल्या युनिटमध्ये ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाच्या 10 फायर गाड्या आणि शंभर जवान अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले आहेत.