Pune News : कोरोनावरील प्रतिबंधक लस बनविणार्‍या ‘सीरम’ इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याचा अग्नीशमनला ‘कॉल’, 4 बंब घटनास्थळी रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र त्याठिकाणी अद्याप तरी अग्निशमन दलाच्या फायर गाड्या पोहचलेल्या नाहीत. आग कशी लागली हे समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना करण्यात आल्या असल्याचे अग्नीशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/CKTY3EPpf3Q/?igshid=1676fwmz5j1dw

अग्निशमन दलाने सांगितले की आग सिरम इन्स्टिट्यूटमध्ये नवीन इमारतीत आग लागली आहे. सिरमने नुकतीच कोरोना व्हाक्सीन तयार केली. त्यानंतर ते जगभरात ओळख निर्मान झाली आहे.

मांजरीच्या साईडला असणाऱ्या नवीन युनिटमध्ये ही आग लागली आहे. त्याचे स्वरूप भीषण असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.