Pune News : डुक्कर खिंड परिसरातील खड्डयात अडकले हरिण, अग्नीशमनकडून 2 तासात सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डुक्कर खिंड परिसरात एका पाईपलाईनच्या खोल खड्यात पडलेल्या हरणाची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. जवळपास दोन ते अडीच तास त्याच्या सुटकेचा थरार सुरू होता. अथक प्रयत्न करत जवासनांनी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

मुंबई-पुणे रस्त्यावर डुक्कर खिंडी भागात मोठ्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी खड्डे खाणले आहेत. या वीस फूट खड्यात हरिण अडकले गेले होते. त्यावेळी काही नागरिकांनी हा प्रकार दिसला. अग्निशमन दलाच्या जवानांना ही माहिती मिळताच येथे धाव घेतली. लागेच सिंहगड रोड अग्निशमन दलाच्या जवान व वन विभागाने त्याच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. जवळपास 1 तासांच्या प्रयत्नानंतर या हरिणाला जाळीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी त्याच्या पायाला जबर जखम झाल्याचे लक्षात आले. हरिणाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू केले गेले आहेत.

अग्निशामन दलाच्या जवान तांडेल शिवाजी मुजुमले, फायरमन शिवाजी आटोळे, संतोष नलावडे तसेच चालक सतीश देशमुख यांनी या हरणाची सुखरूप सुटका केली. तर हरिणाची सुटका करण्यासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक अभिजीत महाले, विश्वेश महाजन, अमित तापासे आणि डॉक्टर सुश्रुत शिरभाते यांनी सहकार्य केले आहे. रस्ता ओलांडत असताना हरिण जखमी झाले. त्यात त्याच्या पायाला इजा झाली आणि वाहनांच्या भितीने ते पळत असंताना इपलाइनच्या खड्ड्यात पडले असावे असे सांगण्यात येत आहे.