Pune News | पुण्यात 1 किडनी असलेल्या 3 वर्षाच्या कुत्र्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, देशातील पहिलीच घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | जन्मत: एकच किडनी असलेल्या रॉली (Rowley) या तीन वर्षाच्या कुत्र्याला अलीकडेच हर्नियाचे निदान झालं. मागील १ वर्षापासुन त्या कुत्र्याला हर्नियाचा त्रास होता. मात्र, त्या कुत्र्याची यशस्वी शस्त्रक्रिया (Surgery) डाॅक्टरांनी केली आहे. अशी घटना ही देशातील पहिलीच घटना आहे. जन्मत:च एक किडनी असलेल्या रॉलीवर दुर्मीळ गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक हर्निक शस्त्रक्रिया (Hernic surgery) यशस्वीरित्या (Pune News) पार पडली आहे.

जन्मत: एकच किडनी असलेल्या रॉली या 3 वर्षाच्या कुत्र्याला उलटी होणे, अतिसार, पाठीत कळ येणे, ओटीपोटात दुखणे, श्वास घेण्यात अडचण येणे आणि वारंवार लाळ गळणे अशी लक्षणे दिसत होती.
मात्र, त्यानंतर राॅलीला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आणले. Gastroscopy, CT scan आणि MRI हे टेस्ट केल्यावर रोगचिकित्सा झाले.
Harmonic scalpel, laparoscopic set आणि liver retractor अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांच्या साहायाने शस्त्रक्रिया केली. 2 तासाच्या शस्त्रक्रियेनंतर रॉली ठिक झाला.

दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर रॉली पंधरा दिवस द्रव आहाराचे सेवन करत असल्याची माहिती डॉ. नरेंद्र परदेशी (Dr. Narendra Pardeshi) यांनी दिली आहे.
तर डॉ. परदेशी यांच्या नेतृत्वाखालील स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिक येथील डॉ. शशांक शाह (Dr. Shashank Shah) यांनी शस्त्रक्रिया केली.
तसेच, डॉ. ज्योती परदेशी, सुधींद्र हरीभत, रीना हरिभत, ऋतुजा काकडे, शिल्पा पुजारी यांची टीम कार्यरत होती.

 

रॉलीचे पालक दिनेश कथुरिया (Dinesh Kathuria) म्हणाले की, शस्त्रक्रियेनंतर रॉलीमध्ये चांगले बदल झाल्याचे आमच्या लक्षात आले. तो आता मुक्तपणे फिरू शकतो.
या शस्त्रक्रियेने आम्हाला पाळीव प्राण्याचे देखील चांगले पालक नक्कीच होता येते, याची जाणीव करून दिली. प्राण्यांनासुद्धा मनुष्यांसारखाच आजार किंवा वेदना होतात, पण आपल्यासारखे ते व्यक्त करू शकत नाहीत. म्हणूनच, जवळच्या पशुवैद्यांना भेट देऊन नियमित तपासणी करणे आणि त्यांना अशा आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी त्यांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

 

Web Title : Pune News | first incident india successful surgery 3 year old dog kidney pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात दुचाकीस्वार मोबाईल चोरांचा धुमाकूळ ! हडपसर, बिबवेवाडी, वानवडी परिसरात महागडे मोबाईल हिसकावले

CM Uddhav Thackeray | ‘तुम्ही चिंता करु नका, लवकर बऱ्या व्हा, तुमच्या धैर्याचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत’

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज (व्हिडीओ)