मनपा क्षेत्रात पाच दिवसांत पाच लाखांची दारू जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शहराती मनपा हद्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथांने धडक कारवाई करत मंगळवारपासून पाच दिवसांत तब्बल पाच लाखांची बेकायदा दारु जप्त केली. याप्रकरणी 32 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 32 जणांना अटक केली आहे. दोन हाॅटेलवर फाैजदारी कारवाई करुन तीन हाॅटेल सील केली आहेत.

विभागाची तीन विशेष पथके महापालिका कार्यक्षेत्रात चोवीस तास गस्त घालत असून अशी कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून विभागातर्फे भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके 24 तास महानगरपालिका क्षेत्रामध्ये व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये गस्त घालत आहेत तसेच या पथकामार्फत संशयास्पद हॉटेल खानावळी व ढाबे यांची तपासणी करण्यात येत आहे.

याशिवाय दारू विक्रीवरही वॉच ठेवण्यात आला आहे. पाच दिवसांत केलेल्या कारवाईत 32 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 837 लिटर हातभट्टीची दारू, 88 लिटर देशी दारू, 65 लिटर विदेशी दारू, गोवा बनावटीची 6 लिटर दारू, पाच वाहने असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07FQFQ5K1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5b58e787-9306-11e8-9dc4-436d47026ee3′]

पहा शहरातील या हाॅटेलवर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली

अवैध दारू विक्रीप्रकरणी आशिर्वाद गार्डन, ऑन द टॉप या ढाब्यांवर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल गझल, हॉटेल ओम गार्डन, हॉटेल पूर्वा पार्क यांच्यावर कारवाई करत ते सील करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.