Pune News | बांधकाम क्षेत्राला अच्छे दिन ! पुण्यात गृहखरेदी 74 टक्क्यांनी वाढली

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच क्षेत्राची घडी विस्कटली गेली आहे. गेल्या काही दिवसापासून मंदावलेली फ्लॅटची विक्रीने (Flat Selling) मात्र यंदा गती धरली आहे. पुणे शहरातील (Pune City) बांधकाम (Construction) क्षेत्राला पुन्हा ‘अच्छे दिन’ आले असून गत वर्षीचे पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत पुण्यामध्ये (Pune) यंदा गृहखरेदी 74 टक्क्यांनी वाढली असल्याचे ‘नाइट फ्रँक इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातुन समोर आले आहे.

Pune News | flat selling 74 percent increase in pune

‘नाइट फ्रँक इंडिया’ने ‘इंडिया रिअल इस्टेट जानेवारी-जून 2021’ हा रिअल इस्टेट (real estate) बाजारपेठेचा अभ्यास करणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात देशातील आठ मोठ्या बाजारपेठांमधील निवासी मालमत्तेच्या स्थितीचे मूल्यमापन केले आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे (Lockdown) जूनपर्यंतची फ्लॅटची विक्री कमी झाली होती.

सहा महिन्यात घरांच्या विक्रीत वाढ

पुण्यात गत वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीचा विचार केला असता 10 हजार 49 घरे विकली गेली होती. मात्र यंदा जूनपर्यंत हाच आकडा 17 हजार 474 वर पोचला असल्याचे ‘नाइट फ्रँक इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणातून (survey) हे स्पष्ट झाले. पश्‍चिमेकडील औंध, बाणेर, वाकड, हिंजवडी, बावधन, पाषाण आणि पूर्वेकडील विमाननगर, खराडी, वाघोली, हडपसर, धानोरी येथील सूक्ष्म बाजारपेठांनी पुण्यातील घरांच्या विक्रीवर वर्चस्व कायम ठेवले आहे.

यामुळे गृहखरेदीमध्ये वाढ

मार्चपर्यंत असलेली मुद्रांक शुल्कातील (Stamp duty) सवलत, गृहकर्जावर (Home loan) कमी झालेले व्याजदर, मोठ्या घरांसाठी वाढलेली मागणी, पहिल्या लाटेनंतर जाणवू लागलेली स्वतःच्या स्वतंत्र घराची गरज, विकासकांनी दिलेल्या ऑफर या सर्व कारणांमुळे गृहखरेदीत वाढ झाली आहे.

जून 2021 मध्ये सर्वाधिक विक्री

नाइट फ्रँक इंडियाचे पुणे शाखा संचालक परमवीर सिंग पॉल (Paramvir Singh Paul) म्हणाले की, पश्चिमेकडील बाजारपेठाच्या नवीन विक्रीत जून 2021 पर्यंत सर्वाधिक 39 टक्के वाटा आहे. तर पूर्वेकडील भागाचा हिस्सा 23 टक्के आहे.

हे देखील वाचा

Unheard War Crime | गरोदर महिलांच्या शरीरात टाकले जात होते जीवघेणे Virus, जपानी लष्कराचे भयावह सत्य

Mumbai Rains | मुंबईकरांसाठी काळरात्र ! पावसामुळे 25 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख तर मोदी सरकारकडून 2 लाखाची मदत जाहीर

Pimpri Crime | जात पंचायतीने ठोठावलेला 15 लाखांचा दंड न भरल्याने तरुण कंजारभाट समाजातून बहिष्कृत; 10 पंचावर FIR

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | flat selling 74 percent increase in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update