Pune News : किसान बाग आंदोलनाला ‘फोरम’चा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   किसान बाग आंदोलनास फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि दुर्गा ब्रिगेड संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ फोरमचे अध्यक्ष अभय भोर, इब्राहिम खान, इन्क्रेडिबल संस्थेचे अध्यक्ष असलम बागवान, मानव कांबळे, दुर्गा ब्रिगेडचे अध्यक्षा दुर्गा भोर, शहर उपाध्यक्ष भारतीताई खाटपे, युवा कार्यकर्ते ऋषीराज तिरखुंडे, आकाश पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. भोर म्हणाले की, शेतकरी हा मुळातच उद्योजक आहे स्वतःच्या शेतामधून धान्य निर्माण करून तो संपूर्ण देशाचा पोशिंदा आहे. सरकारी उद्योगांसाठी अनेक धोरणे जाहीर करतात. बाहेरील उद्योगांना प्राधान्य देऊन रेड कार्पेट दिले जाते परंतु, भारतातून मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात केला जातो या शेतकरी उद्योजकांना सरकारने सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. शेतकरी कायद्यांमध्ये योग्य बदल करून भारतातील शेतकरी जगावा या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.