Pune News | जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या 6 व्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | प्रत्येकाने नेत्रांची निगा घ्यावी व वरचेवर नियमितरित्या डोळ्यांची तपासणी (Eye Checking) करून घ्यावी असे आवाहन पुणे ब्लांइड मेन्स असोसिएशन (Pune Blind Men’s Association) व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे (H. V. Desai Eye Hospital) अध्यक्ष राजेश शहा (Rajesh Shah) यांनी केले. समाजाचे देणे देण्याचे संस्कार करणाऱ्या कै. हिराभाई (भई) यांची पुण्यतिथी अशा वेगवेगळ्या पद्धतीने दरवर्षीच (Pune News) साजरी केली जाते.

 

जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा (चोखावाला) (Founder of Jayaraj Group Kai. Hirabhai Shah (Chokhawala) यांच्या 6 व्या पुण्यस्मरणानिमित्त बांधकाम व घरेलू कामगार यांच्या डोळ्यांचे तपासणी,
चष्मे वाटप तसेच ज्यांना मोतीबिंदू असेल त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शिबीर गुरुवार (दि. 21) घेण्यात आले.
जयराज ग्रुप, अमनोरा येस फाउंडेशन (Amanora Yes Foundation),
रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज (Rotary Club of Pune Katraj) व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले.
याप्रसंगी राजेश शहा बोलत होते. या प्रसंगी अमनोरा येस फौंडेशन चे विवेक कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज च्या अध्यक्षा नमिता नाईक,
नितीन नाईक व गौरी कुलकर्णी, पूना मर्चंट चेंबर चे माजी अध्यक्ष राजेश फूलफगर, राजेंद्र गुगळे, दीपक बोरा,
नितीन नहार, दिलीप रायसोनी दिलीप रुणवाल, सचिन नहार, जगदीश राठी इत्यादी उपस्थित होते. (Pune News)

 

एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे डॉ. सुकेश गुल्पल्ली, डॉ.आरोही खाडे, डॉ.प्राप्ती हरणे, डॉ. संगीता ताजपुरिया,
डॉ. अथर्व जगताप, डॉ. निखिल शामगिरे, श्री. जितेश खरात. या डॉक्टर्स व सहकाऱ्यांकडून 600 कामगारांची नेत्र तपासणी,
200 कामगारांना चष्मे वाटप 60 कामगारांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या शिबीरात अमनोरा पार्क व परिसरातील कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

 

Web Title :- Pune News | Founder of Jayaraj Group Kai. On the occasion of the 6th death anniversary of Hirabhai Shah (Chokhawala), free eye examination, glasses distribution and cataract surgery camp!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Election 2022 | 29 जुलैला महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत, इच्छुक पुन्हा गॅसवर 

 

Gold Price Today | सोने झाले महाग, चांदीची चमक सुद्धा वाढली; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

 

MP Shreerang Barne | मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला, शिवसेनेने…; खा. श्रीरंग बारणेंनी सांगितलं शिंदे गटात जाण्याचे कारण