Pune News : कोरेगाव पार्क परिसरातील ‘तनिष्क’ ज्वेलर्समधून सोन्याच्या बांगडया चोरणार्‍या चौघांना अटक; एजाज खान, संजू गुप्ता, सरिता शर्मा, आयुशी शर्माला 17 जानेवारीपर्यंत कोठडी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बंडगार्डन रस्त्यावर असलेल्या तनिष्क ज्वलर्समधून दागिने खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या चोरी केल्या प्रकरणात चार जणांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. आरोपींनी एकूण 4 लाख 18 हजार रुपये किमतीच्या बांगड्या चोरल्या होत्या. त्यांच्याकडून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

एजाज रियाज खान (वय 33), संजू रवींद्र गुप्ता (वय 35), सरिता राजाराम शर्मा (वय 25) आणि आयुशी गुलाब शर्मा (वय 25, सर्व रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. तीन जानेवारी रोजी बंडगार्डन रस्त्यावरील तनिष्कच्या शोरुममधून सायंकाळी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी व त्यांच्या साथीदारांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बनाव करून बांगडी विभागातील 4 लाख 18 हजार रुपये किमतीचे 66.57 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. शिल्लक दागिन्यांची माहिती घेतल्यानंतर ज्वेलर्स व्यवस्थापनाला चोरीची घटना समजली. त्यानंतर सीसीटीव्ही तपासले असता चौघांनी दागिण्यांन्यावर हात साफ केल्याचे स्पष्ट झाले होते. चौघांना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली व त्यांना 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.