Pune News : गजा मारणे टोळीतील चौघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – रॉयल इंट्री मारत पुण्यात दाखल झालेल्या कुख्यात गुंड गजा उर्फ गजनान मारणे याला न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आज याप्रकरणातील चौघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. शेखर दत्तात्रय आडकर (वय 33), अमोल विनायक तापकीर (वय 31), अमित सुरेश कुलकर्णी (वय 38) व संजय लक्ष्मण पिसाळ (वय 54) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

तर काल गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 48), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) यांना अटक केली होती. त्यांना लागलीच जामीन मिळाला. तर याप्रकरणी अमित कदम, अभिजित विभूते, सोनू गोडांबे, विकी कटारे, राज गायकवाड, सचिन कांबळे, पप्पू घोलप, राहुल दळवी, संतोष शेलार, संदीप पिसाळ, निखिल साळुंखे, सागर पासलकर, अमृत मारणे, शेखर आडकर, श्याम जगताप, महेश (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात भादवि कलम 267, 268, 270, 143, 149 सह डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक संतोष पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

तळोजा कारागृहातून बाहेर आल्यानंतर 500 गाड्यांच्या ताफ्यात मिरवणूक काढत पुण्यात दाखल झालेल्या गजा उर्फ गजनान मारणे याच्यासह समर्थक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आता त्या ताफ्यात कोण कोण होत याचा तपास करत त्यांना अटक करत आहे. त्यानुसार आज कोथरुड पोलोसानी या चौघांना अटक केली आहे.