पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पेटीएम खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाच्या खात्यातून 22 हजारांची रोकड चोरली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात 74 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मोबाइलवर एका व्यक्तीचा फोन आला. त्याने पेटीएम खाते अपडेट करावे लागेल. ते न केल्यास बंद पडेल, अशी भीती दखवली. यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठविली. चोरट्यांनी त्यांना लिंक उघडण्यास सांगितले. लिंक उघडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून चोरट्यांनी ऑनलाइन 22 हजार 618 रुपये लांबविले. पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.