Pune News : कात्रजकडून नवले पुलाकडे जाणार्‍या भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवले, 5-6 जण जखमी, रिक्षाचालक गंभीर

पुणे (Pune ) : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे (Pune ) आणि पिंपरी चिंचवड शहराची सकाळची सुरुवात आज (सोमवार) अपघाताच्या घटनांनी सुरू झाली असून, भूमकर ब्रिजजवळ भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळापूर्वी एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने चार ते पाच वाहनांना उडविले आहे. यात 5 ते 6 जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून कंटेनर नवले ब्रिजकडे येत होता. त्यावेळी त्याचे भूमकर ब्रिजजवळ आल्यानंतर नियंत्रण सुटले आणि त्याने समोर चालणाऱ्या दोन कार आणि एका रिक्षासह वाहनांना उडवले. सकाळी सकाळी हा अपघात झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी वाहतूक व सिंहगड रोड पोलीसांनी धाव घेतली आहे. यात एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून, याला नागरिकांनी रिक्षाच्या बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर इतर वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास I LOVE नर्हे जवळ भीषण अपघात झाला आहे. त्यातून पोलिस बाहेर येत नाही तोवर दुसरा अपघात झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. सकाळी सकाळी अपघात झल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. क्रेन बोलवण्यात आली असून, कंटेनर व अपघात ग्रस्त वाहने बाजूला काढली जात आहेत.