Pune News | राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी मंजूर – हेमंत रासने

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | कात्रज येथील (Katraj) राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या (rajiv gandhi zoological park) सुरक्षिततेसाठी आरसीसीमध्ये सिमाभिंत बांधणे आणि सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यासाठी एक कोटी ५३ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasane) यांनी आज पत्रकार परिषदेत (Pune News) दिली.

 

रासने म्हणाले, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला अधिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष काम करण्यासाठी ९३ लाख २८ हजार रुपये खर्च येणार आहे. ११ लाख १९ हजार रुपये जीएसटी आणि टेस्टिंगसाठी ८५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

 

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक उभारण्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निकषानुसार हा खंदक उभारण्यात येणार (Pune News) आहे.

 

प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्त्याला मंजुरी (Prayeja City to Nanded City d. P. Road clearance)

प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्ता करण्यासाठी आवश्यक असणार्या निधीला
स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या विकासकामासाठी १ कोटी ७६ लाख ७६ हजार रुपये निधीच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली (Pune News) आहे.

 

Web Title :- Pune News | Funds sanctioned for security of rajiv gandhi zoological park -rajiv gandhi zoological park-Prayeja City to Nanded City d. P. Road clearance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा