Pune News : भाजपने 100 मध्ये एक ‘हिरा’ निवडला, पण धीरज घाटेंना आणखी संधी द्यायला हवी होती; विरोधकांकडून सभागृह नेते गणेश बिडकरांचे ‘पुणेरी’ स्टाईलने अभिनंदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भाजपने 100 नगरसेवकांमध्ये गणेश बिडकर यांच्या रूपाने सभागृहपदी एक हिरा नेमला. बापटांचे करावे, पक्षच करावे की 100 नगरसेवकांचे करावे, असे चिमटे घेत विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी आज सर्वसाधारण सभेत बिडकर यांचे अभिनंदन केले.
आबा बागुल म्हणाले की, मनापासून तुमचे कौतुक करतोय. 350 विषय सभेपुढे आहेत. त्याचे बायफरगेशन करा. त्यानुसार विषय करा. तुम्ही अनुभवी आहात. तीन वेळा निवडणून आलात. यंदा पक्षाने कॉ ओप केलेय. तुमच्या नावात गणेश आहे. तुमचे कोथरूड, कसबा, नागपूर असो मुबईचे असोत त्यांनी संधी दिली.

घाटे हे देखील चांगले काम करत होते, त्यांना जरा आणखी संधी द्यायला हवी होती. चार वर्षांत नाही झाला विकास यापुढे वर्षभरात होईल अशा शुभेच्छा .

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, गणेश बिडकर या चांगल्या माणसाला संधी दिली. ते वरच्या सभागृहात जायला हवेत आशी आमची इच्छा आहे. चांगले विषय त्यांनी मार्गी लावले. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला चांगला उपयोग होईल. सर्वांना सोबत घेऊन काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वसंत मोरे म्हणाले, बिडकर यांना चार वर्षानंतर चांगली संधी मिळाली. शेवटच्या ओव्हर मध्ये त्यांना खूप रन्स करायचे आहेत. त्यांनी पालिकेत मोठ्या पदावर काम केलंय. चार वर्षात ते सभागृहात न्हवते. बिडकर च पक्षाला ‘ सुगीचे ‘ दिवस आणतील हे पक्षाच्या लक्षात आल्याने त्यांच्याकडे पद दिले.

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सर्व सदस्यांना न्याय द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अभिनंदनाला उत्तर देताना गणेश बिडकर म्हणाले, पक्षाने मला जाणीवपूर्वक शेवटच्या वर्षात मोठी जबाबदारी दिली त्यांचे आभार. मी जबाबदरीचे भान ठेवून काम करेन. मी सभागृह नेता म्हणून न्हवे तर सभागृहाचा समनव्यक म्हणून काम करेन. कोरोनाच्या आव्हानातून बाहेर पडण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल, असे ते म्हणाले. त्याचवेळी सभागृहापुढे असलेल्या कार्यपत्रिकावरील विषय यासाठी खास सभा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात तशी सुरुवातही करण्यात आली.