Pune News | ‘त्या’ वक्तव्यावरून गणेश बिडकर यांचा खुलासा, म्हणाले… (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News | एका दैनिकाच्या फेसबुक लाईव्हवरील माझे ,’घटना समुद्रात बुडवा‘ हे वक्तव्य संदर्भासहित ऐकावे. यावर माझी भूमिका मांडण्यापूर्वी मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. असं म्हणत पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar, Leader of Pune Municipal Corporation) यांनी त्या वक्तव्यावरून खुलासा केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येकाला न्याय मिळावा अशा हेतूने घटनेची निर्मिती केली आहे. विकास आराखड्यासाठी महापालिकेला मिळालेले अधिकारही बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेने महापालिकेला दिलेले आहेत, त्या घटनादत्त अधिकाराचा गळा घोटण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, याचा अर्थ त्यांचीच कृती ही घटनेचा अवमान करणारी आणि घटनेला किंमत नाही हा संदेश देणारी आहे.

त्यांच्या या कृतीविषयी असलेला त्रागा माझ्या शब्दातून व्यक्त झाला आहे. बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या घटनेमुळेच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकारणात संधी मिळालेली आहे , अशी माझी प्रामाणिक भावना आहे. घटनेचा अवमान करण्याचा हेतू माझ्या स्वप्नात देखील येउ शकत नाही. माझ्या मूळ मुद्द्याला उत्तर देतां येत नसल्याने माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जात आहे. विकास आराखड्यासंदर्भात पुणे महापालिकेच्या घटनादत्त अधिकारांबद्दल मी बोलतच राहील. माझ्या एखाद्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून घटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न मी कधीही यशस्वी होउ देणार नाही.

 

 

तथापी, माझ्या तोंडातून निघालेल्या वक्तव्याबद्धल दिलगिरी व्यक्त करण्यास मला कोणताही संकोच वाटत नाही.
बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्य घटना माझ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र, वंदनीय आणि अनुकरणीयच आहे.

Web Tital : Pune News | Ganesh Bidkar’s revelation from that statement, said …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune News | गणेश बिडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून सभागृह नेते पद रद्द करा; नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी

Gold Price Today | सोने पुन्हा झाले 47 हजारी, चांदी 766 रुपयांनी महागली, जाणून घ्या नवीन दर

PM-Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2,000 रुपये, तात्काळ चेक करा डेट