Pune News : गणेश मोरे यांच्याकडून स्थानिक नागरिकांसाठी तीर्थयात्रेचे आयोजन

पुणे / धानोरी :- स्थानिक नागरिकांसाठी गणेश मोरे यांच्याकडून तीर्थक्षेत्रांची यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेमध्ये तीनशे ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे असून त्यांच्यासाठी 4 गाड्यांची सोय केली. यात्रेमध्ये अक्कलकोट, पंढरपूर, अष्टविनायक आदी तीर्थक्षेत्रांना भेट दिली जाणार आहे. दि. 25 रोजी कळस धानोरी येथून भाविकांच्या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा पूर्णपणे मोफत आहे.

यावेळी नगरसेवक संजय भोसले, रमेश पालकर, समीर पंडित, आशिष ओपळकर, आदी उपस्थित होते. याप्रसंगी गणेश मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले “कोरोना काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर जाता आले नाही; अशावेळी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना देव दर्शन केले जावे अशी माझी इच्छा होती. म्हणून या ‘चला देव दर्शन करु या’ सहलीचे आयोजन केले आहे.”