Pune News : छत्रपतींच्या जयंतीनिमित्त अनाथ मुलांच्या शाळेत दिली प्रथमोपचार साहित्याची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानव अधिकार समितीच्या वतीने लालमहल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनाथ शाळेतील लहान मुलांना प्रथमोपचाराचे साहित्य भेट देण्यात आले.

मानवाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष रियाझजी तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष योगेश शिर्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मानवाधिकार समितीचे शहर उपाध्यक्ष शाहरुख शेख, शहर महिला उपाध्यक्ष कल्पना राऊळ, महिला सचिव हेमा आहेर, महिला संघटक भातकुटे, सेक्रेटरी शैनेश्वर खराडे, संघटक वैभव कदम, सभासद किशोर निंबाळकर, सुनील बारणे, ऋषी कोठारी, ऋषी रोखडे, गणेश पाडळे, ऐश्वर्या परदेशी, प्रमोद पवार, जयसिंग विधाते, विजय गायकवाड आणि मानवाधिकार समितीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.