Pune News | जामिनावर बाहेर अससेल्या 13000 कैद्यांसाठी खुशखबर ! ‘तो’ पर्यंत त्यांना परत जेलमध्ये बोलावले जाणार नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तबल 13 हजार 115 कैद्यांना तात्पुरता जामीन मिळाला आहे. आता या कैद्यांना कोरोनाचा काळ संपणार नाही (पूर्ण आटोक्यात) तोपर्यंत त्यांना परत कारागृहात बोलावले जाणार नाही, असे राज्य कारागृह प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद (Sunil Ramanand) यांनी सांगितले आहे. कैद्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. कोरोना काळात राज्याच्या तुरुंगातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुनील रामानंद यांनी बोलताना ही माहिती दिली आहे.

राज्यातील कारागृह तुडुंब भरलेली आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैदी कारागृहामध्ये आहेत. दरम्यान गेल्या वर्षी राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढला. त्यानंतर कैद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कारागृह प्रशासनान विविध उपाययोजना राबवल्या होत्या. यात कारागृहातील गर्दी टाळण्यासाठी काही कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर बाहेर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाच्या आदेशाने या कैद्यांना सोडण्यात येत आहे. न्यायालयाचे (Court) आदेशानुसार पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा असणारे आणि किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडले जात आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्यानुसार राज्यातील विविध कारागृहातून तब्बल 13 हजार 115 कैदी कारागृहाबाहेर तात्पुरत्या जामिनावर बाहेर सोडण्यात आले आहे. याचा कैद्यांना फायदा झाला आहे. आता त्यांच्यासाठी आणखी एक आनंद देणारी बाब म्हणजे या कैद्यांना कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत कारागृहात घेतले जाणार नसल्याचे अप्पर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद (Sunil Ramanand) यांनी स्पष्ट केले आहे.

कारागृह प्रशासनाच्या या निर्णयामुळे मात्र राज्यातील वेगवेगळ्या शहरात गुन्हेगारीत वाढ झाल्याचे सांगितले जाते.
स्थानिक पोलीस याला दुजेरा देत आहेत.
कारण, पुण्यात काही घटनांमध्ये कोरोनामुळे बाहेर आलेल्या या कैद्यांचा गुन्ह्यात समावेश आहे.
तर एकाचा बाहेर आल्यानंतर खून देखील झाला आहे.
त्यामुळे स्थानिक पोलिसांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे.
शहरातील स्ट्रीट क्राईममध्ये वाढ होण्यास हे कैदी एक कारण असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे कोरोनामुळे कारागृह प्रशासनाने घेतलेला निर्णय कैद्यांच्या पथ्यावर पडत असला तरी शहर अशांत होत असताना दिसून येत आहे.

Web Titel :- Pune News | Good news for the 13000 prisoners who are out on bail, know about that

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार