Pune News | ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये नोंद झालेल्या 2 वर्ष दोन महिने वयाच्या शिवांशला अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यात विश्रांतवाडी (Vishrantwadi, Pune) भागात राहणार्‍या 2 वर्ष दोन महिने वयाच्या कु. शिवांश चंद्रशेखर अडागळे याच्या बौद्धिक कौशल्य आणि चातुर्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (India Book Of Records) नोंद झाली आहे.

त्याचा जन्म पुणे येथे दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी झाला. लहान वयात शाळेत जाण्यापूर्वीच शिवांशला 23 मराठी व इंग्रजी कविता तोंडपाठ आहेत तसेच तो 1ते 30 पर्यंतचे इंग्रजी आकडे, संपूर्ण इंग्रजी वर्णमाला त्याच्या संबंधित शब्दा सहित म्हणून दाखवतो. तसेच बारा रंग, सदतीस प्राणी, चौदा फळे, बारा भाज्या, वीस अवयव, दहा आकार ओळखतो व बोलून दाखवतो. तसेच A-Z (इंग्रजी वर्णमाला ), 1-10 इंग्रजी अंक संगणकाच्या की-बोर्ड वर बिनचूक टाईप करतो. तसेच पंधरा प्राण्यांचे आवाज काढतो. हनोई टॉवर नऊ सेकंदात लावतो. 27 पेक्षा जास्त क्रिया (इंग्रजीमध्ये सांगितल्यास) करतो या व्यतिरिक्त तो आठवड्याचे दिवस म्हणून दाखवतो, वाहनांचे वेगवेगळे भाग ओळखतो.

अशा कर्तत्ववान मुलाचा यथोचित सन्मान आणि कौतुक आज विधानभवन,
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (deputy chief minister ajit pawar)
यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, शाल-श्रीफल, पुष्पगुच्छ आणि चाॅकलेट देऊन सन्मान करण्यात आला.
भविष्यात मोठमोठे यशाची शिखरे आणि विक्रम पादाक्रांत करावीत अशा शुभेच्छा दादांनी दिल्या.
याप्रसंगी आमदार सुनिल टिंगरे (mla sunil tingre),
प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख (NCP Youth Leader Pradeep Deshmukh),
विनोद पवार, विजय देसाई, श्रिनिवास मेखला, नचिकेत साळवी आणि अडागळे कुटुंब उपस्थित होते.

Web Title :- Pune News | Greetings from Ajit Pawar to Shivansh, 2 years and 2 months old, recorded in India Book of Records

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे मनपाकडून ‘अनलॉक’चे सुधारित आदेश जारी; रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान संचारबंदी लागू, जाणून घ्या इतर आस्थापनांच्या वेळा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, 233 रुग्णांना डिस्चार्ज

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 220 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी