Pune News : पुण्यातील गुटखा मार्केटचे गुजरात ‘कनेक्शन’ !, पोलिसांची वापी आणि सिल्वासामध्ये छापेमारी, 15 कोटींचा माल जप्त, पुण्याचा गुटखा किंग कोन ?

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – राज्यासह पुण्यातील गुटखा कनेक्शन पुणे पोलिसांनी शोधून काढत सर्वात मोठी कारवाई केली असून, चंदननगर ते गुजरात गुटखा कारवाई करत तबल 15 कोटी रुपयांचा गुटखा पकडला आहे. त्यामूळे गुजरात अन् राज्यात व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून त्यांची नावे निष्पन्न झाले आहेत. यात ते फरार आहेत, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे व उपायुक्त बच्चन सिंह उपस्थित होते.

पुणे पोलिसांनी 17 डिसेंम्बर रोजी चंदननगर परिसरात छापे मारी करत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, नीरज मुकेश सिंगल, प्रवीण मुकुंद वाहुळ यांच्यावर छापमारी करत साडे सात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक करत होते.

आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि त्यांच्या पथकाची कारवाई सुरू असताना गुटख्यात हवाला मार्फत पैसे देवाण घेवाण होत असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी छापे टाकत फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली होती. यावेळी 9 जणांना पकडण्यात आले होते. तर 4 कोटींच्या जवळपास रोकड पकडली होती. एकाच वेळी वेगवेगळ्या 5 ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर हडपसर आणि वानवडी येथे देखील छापे टाकत चौघांना अटक केली. त्यात 25 लाख रुपयांचा गुटखा पकडला होता. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुटखा कनेक्शन हे गुजरातमधील वापी व सिल्वासा येथे असल्याचे समजले होते.

त्यानुसार सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक जयदीप पाटील, कर्मचारी राजेश शेख, सचिन ढवळे, कौस्तुभ जाधव, शीतल शिंदे यांच्या पथकाने या दोन ठिकाणी छापे मारी करत तबल 15 कोटी रुपयांचा ‘गोवा’ गुटखा आणि इतर गुटखा पकडला आहे. कारवाईत मात्र पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. ते फरार झाले असून, त्यांची नावे निष्पन्न झाले आहेत, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्याचा गुटखा किंग कोन ?

पोलिसांनी गुटखा बंदीच्या विरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कोटयावधी रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील गुटखा किंग कोन ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.