Pune News : जंगली महाराज रस्त्यावरील पान टपरीमधून सव्वा लाखाचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू असणाऱ्या गुटखा कारवाई आणखी तीव्र झाली असून, युनिट एकच्या पथकाने झाशी राणी चौकात टपरीवर छापा टाकून सव्वा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

ॲलेक्सझांडर सेल्सवम (वय 45, रा. संभाजी पार्क) असे पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जोरदार गुटखा कारवाई सुरू केली आहे. तर अवैध धंदे देखील मोडीत काढले जात आहेत. यादरम्यान युनिट एकचे कर्मचारी सचिन जाधव यांना माहिती मिळाली की संभाजी उद्यानाजवळ एका टपरी चालकाकडून गुटखा विक्री केली जात आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, हनुमंत शिंदे, कर्मचारी सतिश भालेकर, सचिन जाधव, अशोक माने, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख, शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे.

त्याठिकाणी सव्वा लाख रुपयांचा आरएमडी तसेच इतर गुटखा पकडण्यात आला. गुन्हे शाखेने चालक व माल पुढील कारवाईसाठी डेक्कन पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

You might also like