Pune News | नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर आजपासून धावणार हडपसर-मोरगाव पीएमटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | मोरगावला मयूरेश्वराच्या (morgaon ganpati) दर्शनाला पुणे व मुंबईच नव्हे तर राज्यातून येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मोरगाव-पुणे अशी पीएमपी सुरु करण्याची मागणी अनेक दिवसापासून सुरु होती, अखेर त्याला मुहूर्त मिळाले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर आजपासून हडपसर-मोरगाव पीएमपी बस सेवा सुरु केली जाणार आहे . प्रायोगिक तत्वावर बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या होणार असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune News) सांगितले.

मोरगावला जिल्ह्यातील महत्वाची बाजार पेठ असल्याने येथून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय मयूरेश्वराला यणाऱ्या भक्तांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मोरगावच्या वतीने सरपंच निलेश केदारी (sarpanch nilesh kedari) यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन पीएमपी बस सुरु करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडेही यासंदर्भात पाठपुरावा केला होता. तसेच पुणे महानगर परिवहन मंडळाला चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रव्यवहार करुन बससेवा सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर आजपासून हडपसर-मोरगाव अशी बस (hadapsar to morgaon bus) सुरु करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Web Title : Pune News | hadapsar morgaon PMPML city bus service starts 7 october

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Accident News | उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे बस-ट्रकची समोरासमोर धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू

Pune Crime | 10 लाखाच्या खंडणीचं प्रकरण : राजेश बजाज, बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

Rajesh Tope | दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता? राजेश टोपे म्हणाले…